Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigadh Politics: स्नेहल जगतापांच्या अजित पवारांचा राष्ट्रवादीत प्रवेश..; पण नव्या वादाची ठिणगी

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आघाडीतील अनेक प्रमुख नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 19, 2025 | 09:17 AM
Raigadh Politics: स्नेहल जगतापांच्या अजित पवारांचा राष्ट्रवादीत प्रवेश..; पण नव्या वादाची ठिणगी
Follow Us
Close
Follow Us:

रायगड:  राजकीय वर्तुळातून महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाडमधील चांदे मैदानावर पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे रायगड जिल्ह्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना चालना मिळण्याची शक्यता आहे. स्नेहल जगताप या पूर्वी ठाकरे गटाच्या महत्त्वाच्या नेत्या मानल्या जात होत्या. त्यांचा राष्ट्रवादीत झालेला प्रवेश उद्धव ठाकरे यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मोठा धक्का मानला जात आहे.

विशेष म्हणजे, स्नेहल जगताप या शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांच्या प्रमुख राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जातात. सध्या रायगडच्या पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी या पदावर दावा केल्याने दोन्ही गटांमध्ये वाद सुरू आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश आणखीच राजकीय रंग घेण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यात अननस खाल्यामुळे शरीराच्या ‘या’ अवयवांना मिळते भरपूर पोषण, हृद्य राहील कायम निरोगी

स्नेहल जगताप राष्ट्रवादीत, रायगडमधील संघर्ष उफाळण्याची शक्यता

या पार्श्वभूमीवर, सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात रायगडच्या पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसने स्नेहल जगताप यांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे येथील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रवेश सोहळ्याला खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगले यश मिळवले होते. महायुतीमधील अनेक दिग्गज पराभूत झाले होते. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार पुनरागमन केले आणि राज्यात स्पष्ट बहुमत मिळवले. महायुतीने तब्बल 232 जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला केवळ 50 जागांवर समाधान मानावे लागले.

World Baking Day : आज जगभरात साजरा केला जात आहे ‘World Baking Day’, जाणून घ्या याचा रंजक इतिहास

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आघाडीतील अनेक प्रमुख नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे. या गळतीचा सर्वाधिक फटका शिवसेना (ठाकरे गट) यांना बसलेला दिसतो. ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. अशातच, आता स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

कोण आहेत स्नेहल जगताप?

स्नेहल माणिकराव जगताप या महाड-पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांची कन्या आहेत. त्यांनी महाडच्या नगराध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर राजकारणात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना (ठाकरे गट) मध्ये प्रवेश केला आणि या पक्षाकडून निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. स्नेहल जगताप यांना 91,232 मते मिळाली, तर शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार भरत गोगावले यांनी 1,17,442 मतांसह विजय मिळवला. ही लढत 26,210 मतांच्या फरकाने निर्णायक ठरली.

Web Title: Snehal jagtaps entry into ajit pawars ncp but sparks a new controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 09:10 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

संघापासून अजितदादा चार हात दूर? तळेगाव-दाभाडे नगर परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले, राजकीय भूमिकेची चर्चा
1

संघापासून अजितदादा चार हात दूर? तळेगाव-दाभाडे नगर परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले, राजकीय भूमिकेची चर्चा

माघार नाहीच ! महायुतीतील दोन बड्या नेत्यात अखेर लढाई ठरली; अजित पवार अन् मुरलीधर मोहोळ भिडणार
2

माघार नाहीच ! महायुतीतील दोन बड्या नेत्यात अखेर लढाई ठरली; अजित पवार अन् मुरलीधर मोहोळ भिडणार

वडगावमधील पाणी प्रश्न कायमचा सुटणार! ४० कोटी रुपयांच्या विकासकामांचे DCM अजित पवार हस्ते होणार भूमिपूजन 
3

वडगावमधील पाणी प्रश्न कायमचा सुटणार! ४० कोटी रुपयांच्या विकासकामांचे DCM अजित पवार हस्ते होणार भूमिपूजन 

Nashik News: ठाकरेंचा भाजपला पहिला धक्का; नाशिकमध्ये दोन बडे नेते ठाकरे गटात प्रवेश करणार
4

Nashik News: ठाकरेंचा भाजपला पहिला धक्का; नाशिकमध्ये दोन बडे नेते ठाकरे गटात प्रवेश करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.