Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षण सुरु, 72 पैकी 10 ठिकाणी बोअर मारण्याचं काम पूर्ण, शेतकऱ्यांनी सहमती दिली का?

बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी (Barsu Refinery) राज्य सरकारकडून साडे तेरा हजार एकर जमीन या प्रकल्पासाठी ताब्यात घेतली जाणार होती. पण आताच्या माहितीनुसार, केवळ साडेपाच हजार एकर जमीन या प्रकल्पासाठी ताब्यात घेतली जाणार आहे.

  • By साधना
Updated On: Apr 29, 2023 | 07:10 PM
borewell work

borewell work

Follow Us
Follow Us:

रत्नागिरी: रिफायनरी प्रकल्प उभारणीसाठी बारसूतील (Barsu Refinery Project) जमीन योग्य आहे की नाही, याचे परीक्षण करण्यासाठी बोअर मारण्यात येणार आहेत. बारसूमध्ये 72 पैकी 10 ठिकाणी बोअर मारण्याचं काम पूर्ण झालं आहे. तसेच 72 पैकी 46 शेतकऱ्यांनी उर्वरित बोअरवेलसाठी सहमती दर्शवली आहे.(Ratnagiri News)

याआधी बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी (Barsu Refinery) राज्य सरकारकडून साडे तेरा हजार एकर जमीन या प्रकल्पासाठी ताब्यात घेतली जाणार होती. पण आताच्या माहितीनुसार, केवळ साडेपाच हजार एकर जमीन या प्रकल्पासाठी ताब्यात घेतली जाणार आहे. प्रकल्पासाठी कमीत कमी जमीन वापरण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

प्रकल्पाला होणारा विरोध मावळण्याची चिन्हे
बारसू प्रकल्पात एकही घर जाणार नाही. एक मस्जिद जात होती ती देखील आता प्रकल्पात जाणार नसल्याची माहिती मिळाली आहे. तसेच कातळ शिल्पाचा जागतिक वारसाही प्रकल्पात जाणार नाही. पण, जी साडेपाच हजार एकर जमीन वापरली जाणार आहे, त्यातील केवळ 2900 हजार एकर जमिनीसाठी शेतकऱ्यांनी संमती दर्शवली आहे. प्रकल्पासाठी 46 शेतकऱ्यांची सहमती ही बारसू प्रकल्पाच्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे, त्यामुळे या प्रकल्पाला होणारा विरोध मावळण्याची चिन्ह दिसत आहेत.

पर्यावरणाची हानी आणि मावेज यांच्यामुळे बारसू प्रकल्पाला गावकरी विरोध करत होते. मावेजासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. काही गावकरी 40 हजाराचा दर दिला जाणार असल्याचं म्हणत आहेत, पण एमआयडीसीकडून अजून कोणतेही परीपत्रक आलेले नाही, परीपत्रक निघाल्यावरच नेमका किती दर मिळणार ही गोष्ट स्पष्ट होईल.

ग्रामस्थांच्या मनात अनेक शंका
ग्रामस्थांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं राज्य सरकारने देण्याची गरज आहे. लोकांच्या मनातील शंका-कुशंकेचं निरसन करणं महत्त्वाचं आहे. बारसू प्रकल्प झाल्यास गावातील किती लोकांना रोजगार मिळणार, याबद्दलही ग्रामस्थांच्या मनात शंका आहेत. कोकणातील मंडळींनाच रोजगार मिळणार का? याचं उत्तरही अजून सरकारकडून सुस्पष्टपणे मिळत नाही.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीनुसार, एक लाख लोकांना थेट रोजगार मिळेल. त्या एक लाखापैकी प्रत्यक्ष स्थानिकांना किती रोजगार मिळणार, याचं उत्तर अद्याप मिळालेलं नाही. पण साधारण एकूण 2 कोटींचं हे काम असून सध्या बोअरवेलसाठी परवानगी मिळाली आहे. 72 पैकी 46 गावकऱ्यांनी माती परीक्षणासाठी सहमती दिलेली आहे.

Web Title: Soil testing for barsu refinery project is started nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2023 | 07:08 PM

Topics:  

  • Barsu
  • maharashtra

संबंधित बातम्या

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू
1

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
2

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी
3

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा
4

Maharashtra Court: ‘समान काम, समान वेतन’साठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा एल्गार! ५ नोव्हेंबरला सामूहिक रजेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.