Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत असणार मुदत

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी कृषी शिक्षणाच्या अंतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 12, 2026 | 02:36 PM
कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात; 'या' तारखेपर्यंत असणार मुदत

कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात; 'या' तारखेपर्यंत असणार मुदत

Follow Us
Follow Us:

सोनाजी गाढवे / पुणे : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रवेशासाठी कृषी शिक्षणाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठांमधील बी.एस्सी. (ऑनर्स) कृषी, बी.एस्सी. (ऑनर्स) उद्यानविद्या, बी.एस्सी. (ऑनर्स) वनविद्या, बी.एफ.एस्सी. मत्स्य विज्ञान, बी. टेक. कृषी अभियांत्रिकी, बी. टेक. अन्न तंत्रज्ञान,बी.एस्सी (ऑनर्स)सामुदायिक विज्ञान, बी.टेक. जैवतंत्रज्ञान बीएससी (ऑनर्स) कृषी व्यवसाय व्यवस्थापन या नऊ पदवी व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस दिनांक १० जुलै २०२६ पासून सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख २५ जुलै २०२६ आहे.

 

राज्यातील चार कृषी विद्यापीठांतर्गत नऊ विद्याशाखेमध्ये हे चार वर्षाचे व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम शिकविले जातात. राज्यात १९५ कृषी महाविद्यालयात प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता १७ हजार ५८६ आहे. एमएचटी-सीईटी २०२६ तसेच संबंधित अभ्यासक्रमांसाठी विहित इतर राष्ट्रीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण/पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळावरील संबंधित लिंकद्वारे विहित मुदतीत ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करणे बंधनकारक राहील. कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा वगळता इतर सर्व विद्याशाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रतेमध्ये एमएचटी-सीईटी / जेईई याबरोबरच नीट सामायिक प्रवेश परीक्षेचा समावेश आहे. तथापि, नीट सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र पदवी प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरु करणेही गरजेचे असल्याने पदवी प्रवेश प्रक्रियेचे सन २०२६-२७ साठीचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अंतरिम गुणवत्ता यादी, ऑनलाईन तक्रार नोंदविणे, अंतिम गुणवत्ता यादी, उपलब्ध जागांची प्रसिध्दी, प्रवेश वाटप फेऱ्या, केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी, महाविद्यालयस्तरीय प्रवेश फेरी, संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया व प्रवेश फेरी इत्यादी सर्व प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक नीट सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रसिध्द करण्यात येईल.

हे सुद्धा वाचा : प्रताप सरनाईक यांचा स्तुत्य उपक्रम! वारकऱ्यांसाठी स्वखर्चातून सुरू केली ‘मोफत मोबाईल चार्जिंग’ सुविधा

प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, प्रवेश नियमावली, वेळापत्रक तसेच वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या सूचना www.mahacet.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. विद्यार्थ्यांनी सदर संकेतस्थळास नियमित भेट देऊन अद्ययावत सूचनांचे पालन करावे असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

Web Title: Admission registration for the agriculture course has begun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

पुणे महापालिकेची अतिक्रमणविरोधात मोठी कारवाई; 35 हजार स्केअर फुटांचे बांधकाम जमीनदोस्त
1

पुणे महापालिकेची अतिक्रमणविरोधात मोठी कारवाई; 35 हजार स्केअर फुटांचे बांधकाम जमीनदोस्त

Sports: ४० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस! भारतात रंगणार आंतरराष्ट्रीय गोल्फपटूंचा थरार
2

Sports: ४० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस! भारतात रंगणार आंतरराष्ट्रीय गोल्फपटूंचा थरार

Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
3

Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!
4

Shiv Sena Protest: ‘बाळासाहेब ठाकरे कलादालन १ नोव्हेंबरपूर्वी खुले करा; अन्यथा…’ शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.