Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: मोठी बातमी! संकटात आता फक्त ‘112’ डायल करा; एका कॉलवर धावणार मदतीचा ताफा, कसं ते जाणून घ्या…

Solapur News: सोलापूर ग्रामीण पोलिसांची डायल 112 आपत्कालीन सेवा सुरू. संकटाच्या वेळी नागरिकांना एका कॉलवर पोलिस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची मदत मिळणार.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 04, 2026 | 11:21 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया) संकटात आता फक्त '112' डायल करा

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया) संकटात आता फक्त '112' डायल करा

Follow Us
Follow Us:

सोलापूर: सोलापूर ग्रामीण पोलिसांनी नागरिकांसाठी एक महत्त्वाची सुविधा सुरू केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत आता नागरिकांना पोलिस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका या तिन्ही सेवा एका कॉलवर उपलब्ध होणार आहेत. यासाठी नागरिकांनी फक्त 112 हा क्रमांक डायल करायचा आहे.ही एकात्मिक आपत्कालीन सेवा २४ तास कार्यरत असून, नागरिकांनी या सुविधेचा जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे. (Solapur News)

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेली ही सेवा नागरिकांना विनामूल्य उपलब्ध आहे. 112 या क्रमांकावर कॉल केल्यानंतर अत्याधुनिक GPS तंत्रज्ञानाच्या मदतीने नियंत्रण कक्षातून सर्वात जवळील पोलिस वाहन, रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाला तात्काळ माहिती पाठवली जाते. त्यामुळे मदत कमी वेळेत घटनास्थळी पोहोचू शकते.

112 India’ हे मोबाईल अॅप देखील उपलब्ध

याशिवाय नागरिक ‘112 India’ हे मोबाईल अॅप डाउनलोड करूनही मदत मागू शकतात. या अॅपमधील SOS बटण आणि लाईव्ह लोकेशन सुविधेमुळे नियंत्रण कक्षाला अचूक ठिकाणाची माहिती मिळते. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आपत्कालीन परिस्थितीतील नागरिकांसाठी ही सुविधा अधिक उपयुक्त ठरणार आहे.

बुलढाण्यात पावसाचा धुमाकूळ; ११ तालुक्यांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस, मलकापूर-सोलापूर महामार्ग ठप्प

विनाकारण कॉल करू नका; पोलिसांचे आवाहन

पोलिसांनी नागरिकांना डायल 112 चा वापर केवळ खऱ्या आपत्कालीन परिस्थितीतच करण्याचे आवाहन केले आहे. खोटी माहिती देणे किंवा विनाकारण कॉल करणे टाळावे. कॉल करताना घटनेचे ठिकाण आणि परिस्थितीची स्पष्ट माहिती द्यावी तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.

‘112 India’ अॅपची वैशिष्ट्ये

  1. SOS बटणाद्वारे तात्काळ मदतीची विनंती
  2. लाईव्ह लोकेशनद्वारे घटनास्थळाची अचूक माहिती
  3. GPS च्या मदतीने जवळील पोलिस वाहन त्वरित रवाना
  4. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांसाठी उपयुक्त सेवा

‘डायल 112’ कधी वापरावे?

  1. चोरी, दरोडा किंवा संशयास्पद हालचाली
  2. महिलांवरील अत्याचार, छेडछाड किंवा कौटुंबिक हिंसाचार
  3. रस्ते अपघात किंवा तातडीची वैद्यकीय मदत
  4. आग लागणे किंवा इतर कोणतीही आपत्कालीन घटना
डायल 112 या सेवेमुळे आता नागरिकांना पोलिस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची मदत एका कॉलवर उपलब्ध होणार असून, आपत्कालीन परिस्थितीत अधिक जलद आणि प्रभावी प्रतिसाद मिळण्यास मदत होणार आहे.

आदिनाथ साखर कारखान्याच्या लिलावाला नारायण पाटीलांचा विरोध; ‘रक्त सांडू पण आदिनाथ विकू देणार नाही’

Web Title: Solapur news dial 112 emergency service police ambulance fire brigade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 11:21 AM

Topics:  

  • Ambulance
  • Solapur

संबंधित बातम्या

आदिनाथ साखर कारखान्याच्या लिलावाला नारायण पाटीलांचा विरोध; ‘रक्त सांडू पण आदिनाथ विकू देणार नाही’
1

आदिनाथ साखर कारखान्याच्या लिलावाला नारायण पाटीलांचा विरोध; ‘रक्त सांडू पण आदिनाथ विकू देणार नाही’

बुलढाण्यात पावसाचा धुमाकूळ; ११ तालुक्यांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस, मलकापूर-सोलापूर महामार्ग ठप्प
2

बुलढाण्यात पावसाचा धुमाकूळ; ११ तालुक्यांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस, मलकापूर-सोलापूर महामार्ग ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.