Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News : विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात? माळशिरस तालुक्यात गुटख्याची खुलेआम विक्री, तर शासनाची बंदी कागदावरच?

Solapur News: गुटखा, मावा आणि सुगंधी तंबाखूच्या विक्रीवर बंदी असतानाही अकलूजसह माळशिरस तालुक्यात गुटख्याची खुलेआण विक्री केली जात आहे.विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालये तसेच चौका-चौकातील पानटपऱ्या आणि किराणा दुकानांमधून हे पदार्थ सहज उपलब्ध होत आहे

  • By अमृता यादव
Updated On: Aug 06, 2026 | 11:41 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Solapur News: अकलूज : महाराष्ट्र शासनाने गुटखा, मावा आणि सुगंधी तंबाखूच्या विक्रीवर बंदी घातलेली असतानाही अकलूजसह माळशिरस तालुक्यात या पदार्थांची सर्रास विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालये तसेच चौका-चौकातील पानटपऱ्या आणि किराणा दुकानांमधून हे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

शाळा-कॉलेज परिसरातच सुरू विक्री

शासनाच्या नियमानुसार शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र अकलूज, माळशिरस, वेळापूर, पिलीव, संग्रामनगर, नऊचारी आणि नातेपुते परिसरातील अनेक शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेशद्वाराजवळच गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

अनेक ठिकाणी हे पदार्थ पिशव्यांमध्ये, डब्यांमध्ये किंवा इतर वस्तूंआड लपवून विकले जात असल्याचेही सांगण्यात येत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी, सुटल्यानंतर आणि महाविद्यालये सुटण्याच्या वेळेत अशा दुकानांवर विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

‘व्यसनमुक्ती शपथ अभियानाचा शुभारंभ; Mangal Prabhat Lodha म्हणाले, ‘… ही काळाची गरज आहे’

आरोग्याला गंभीर धोका

गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग, दातांचे विकार तसेच इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो. तरीही अनेक विद्यार्थी व्यसनाच्या आहारी जात असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नागरिकांच्या मते, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नाही. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे धडक मोहीम राबवून अशा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. छापे, दंड आणि जप्तीच्या कारवाया केवळ कागदोपत्री राहिल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

Balumama Devasthan Scam:   आणखी एका मंदिरातील आर्थिक गैरव्यवहाराचा पर्दाफाश; बाळूमामा देवस्थानातील 60.75 कोटींच्या गैरव्यवहार उघड

नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा

महाराष्ट्र शासनाने अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाला, गुटखा यांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ५ लाख रुपयांपर्यंत दंड आणि ६ महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.

नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्त कारवाई करून गुटखा विक्रेत्यांवर कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. अन्यथा पुढील पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकण्याचा धोका अधिक वाढेल.

Web Title: Solapur news malshiras gutkha sale near schools government ban ignored marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Solapur
  • Tobacco

संबंधित बातम्या

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
1

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली
2

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार
3

Jalgaon News: जळगाव ZPमध्ये खळबळ! 71 कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व संशयास्पद, नोकरीवर टागंती तलवार

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू
4

Jalgaon News: बाक हलविण्याच्या वादातून बापलेकाला कारने चिरडलं! वडिलांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.