Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News : करमाळा तालुक्यात विवाहप्रश्न गंभीर ; सरकारी नोकरीअभावी हजारो तरुण अविवाहित

सरकारी नोकरी नसणे, वाढत्या आर्थिक अपेक्षा, स्थावर मालमत्तेचा अट्टहास आणि बदलती सामाजिक मानसिकता यांमुळे करमाळा तालुक्यातील हजारो तरुणांचा विवाहप्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 25, 2025 | 07:53 PM
Solapur News : करमाळा तालुक्यात विवाहप्रश्न गंभीर ; सरकारी नोकरीअभावी हजारो तरुण अविवाहित
Follow Us
Close
Follow Us:
  • करमाळा तालुक्यात विवाहप्रश्न गंभीर ;
  • सरकारी नोकरीअभावी हजारो तरुण अविवाहित
  • मुलींच्या वाढत्या अपेक्षांचा परिणाम
करमाळा/ दिनेश मडके : सरकारी नोकरी नसणे, वाढत्या आर्थिक अपेक्षा, स्थावर मालमत्तेचा अट्टहास आणि बदलती सामाजिक मानसिकता यांमुळे करमाळा तालुक्यातील हजारो तरुणांचा विवाहप्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. करमाळा तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात 100 ते 150 युवक 30 वर्षांहून अधिक वयाचे झाले असूनही अविवाहित असल्याचे चित्र आहे. यामध्ये शेतकरी, शेतीपूरक व्यवसाय करणारे, छोटे व्यावसायिक तसेच खासगी नोकरीतील तरुणांचा मोठा समावेश आहे. तालुक्यात शेती हा प्रमुख व्यवसाय असला तरी अनिश्चित पाऊसमान, नैसर्गिक आपत्ती, वाढती उत्पादन खर्च आणि बाजारभावातील चढउतार यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न स्थिर राहत नाही. त्यामुळे अनेक तरुणांकडे “स्थिर उत्पन्न असल्याचा दाखला नसतो. परिणामी विवाह जुळवताना “सरकारी नोकरी” हाच मुख्य निकष ठरवला जात असल्याने कष्टाळू, प्रामाणिक आणि जबाबदार तरुणांनाही सातत्याने नकार मिळत मिळत असल्याचे चित्र आहे.

Sindhudurg News : आंबा काजू पिकाची दरवर्षी E KYC चीअडसरच; बागायती शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

वाढत्या अपेक्षा आणि बदलती सामाजिक परिस्थितीमुळे मुलीच्या शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर होत आहेत, ही बाब समाजासाठी निश्वितव सकारात्मक आहे. मात्र विवाहाच्या बाबतीत नोकरी, मासिक उत्पन्न, स्वतःचे घर, शेती, वाहन आणि सामाजिक प्रतिष्ठा यांसारख्या बाबींमध्ये अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. याचा फटका ग्रामीण भागातील तरुणांना बसत असून अनेक तरुणांचे वय निघून जात आहे. काही तरुण घटस्फोटीत किंवा विधवा महिलांशी विवाह करण्यासही तयार असतानाही नोकरी मालमत्तच्या अटीमुळे विवाह जुळत नसल्याची उदाहरणे वाढत आहेत.

यामुळे जातीअंतर्गत विवाह करणे अधिक कठीण होत बालले असून अनेक कुटुंबांसमोर आंतरजातीय विवाह हाच पर्याय उरत असल्याचे जाणकारांचे मत आहे. लग्न जमवण्यासाठी वधू-वर सूचक मंडळांचा वाढते व्यवसायीकरण झाले आहे पूर्वी विवाह जुळवण्यात नातेवाईक, गावकरी व सामाजिक संबंध महत्त्वाची भूमिका बजावत असत. मात्र आता या जागी वधू-वर सूचक मंडळांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश केला आहे. करमाळा तालुक्यातील अनेक सूचक मंडळांकडून स्थळ दाखवण्यासाठी 5 ते 10 हजार रुपयांची फी घेतली जाते, तर विवाह जुळल्यास लग्न लावून देण्यासाठी 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत रक्कम मागितली जात असल्याच्या तक्रारी मुलांच्या पालकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय च सर्वसामान्य कुटुंबांवरील आर्थिक ओझे वाढत आहे.

अवास्तव अपेक्षा घातक ठरण्याची भीती

सामाजिक जाणकार आणि ज्येष्ठ नागरिकांनी मुलींच्या पालकांना अवास्तव अपेक्षा न ठेवण्याचे आवाहन केले आहे. प्रामाणिक, कष्टाळू, चारित्र्यसंपन्न आणि जबाबदार व्यावसायिक तरुणांना संधी दिल्यास अनेक संसार सुखी होऊ शकतात, असे मत व्यक्त केले जात आहे. केवळ स्थावर मालमत्तेच्या मोहापायी निर्णय घेतल्यास भविष्यात हुंडा छळ आणि हुंडाबळीच्या घटनांची शक्यता वाढू शकते, असा इशाराही देण्यात येत आहे.

Washim News: पोकरा योजनेला भ्रष्टाचाराने पोखरले! ३३ पानांची पुराव्यासहित तक्रार दाखल

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: करमाळा तालुक्यात विवाहप्रश्न गंभीर का बनला आहे?

    Ans: सरकारी नोकरीचा अभाव, स्थिर उत्पन्न नसणे, वाढती आर्थिक अपेक्षा, शेतीतील अनिश्चितता आणि बदलती सामाजिक मानसिकता यामुळे अनेक तरुणांचे विवाह जुळत नाहीत.

  • Que: तालुक्यात किती तरुण अविवाहित असल्याचे चित्र आहे?

    Ans: करमाळा तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात 30 वर्षांहून अधिक वयाचे 100 ते 150 युवक अजूनही अविवाहित असल्याचे आढळते.

  • Que: शेती व्यवसायाचा विवाहप्रश्नाशी काय संबंध आहे?

    Ans: अनिश्चित पाऊस, नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील चढउतार यामुळे शेतीतून स्थिर उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे विवाहासाठी आवश्यक मानला जाणारा “स्थिर उत्पन्नाचा दाखला” तरुणांकडे नसतो.

Web Title: Solapur news marriage issue is serious in karmala taluka thousands of youth are unmarried due to lack of government jobs result of increasing expectations of girls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 07:49 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur : सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीचा अर्ज फेटाळला
1

Solapur : सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याच्या मागणीचा अर्ज फेटाळला

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश
2

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Karmala MSEDCL Billing Bssue: करमाळ्यात महावितरणचा भोंगळ कारभार; सोलर असूनही अवाच्या सवा वीज बिले
3

Karmala MSEDCL Billing Bssue: करमाळ्यात महावितरणचा भोंगळ कारभार; सोलर असूनही अवाच्या सवा वीज बिले

Solapur Crime: कॉलेजमध्ये रॅगिंगचा कहर; 11वीच्या विद्यार्थ्याला तीन तास स्टम्पने मारहाण, कॉलेज प्रशासनावर गंभीर आरोप
4

Solapur Crime: कॉलेजमध्ये रॅगिंगचा कहर; 11वीच्या विद्यार्थ्याला तीन तास स्टम्पने मारहाण, कॉलेज प्रशासनावर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.