फोटो सौजन्य सोशल मिडिया
सोलापुरात पिण्याच्या पाण्यासाठी मनसेचे आंदोलन करत असून मोडनिंब, अरण, जाधववाडी, बैरागवाडी आणि तुळशी गवांतील शेतकऱ्यांना पाणी नसल्यामुळे मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहण्यास मिळत आहे.
तालुक्यात सीना माढा उपसा सिंचन योजना सुरू होऊन तिन महिने झाले असून गावातील नागरिकांना आंदोलन करावे लागत आहेत. एकी कडे दुष्काळाची दाहकता असून शेतकरी हतबल झाले आहेत. मोडनिंब, अरण, जाधववाडी, बैरागवाडी आणि तुळशी गावांतील संतप्त शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहे. पाऊस नसल्यामुळे शेतीची आणि जनावरांची अवस्था बिकड असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
तात्काळ सिमा माढा सिमा योजनेचं पाणी मिळावं या साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन रस्यावर आंदोलन करताना दिसत आहेत. दुष्काळाची दाहकता वाढत असताना शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे दिसत आहेत.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोडनिंब, अरण, जाधववाडी, बैरागवाडी आणि तुळशी गावांतील संतप्त शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले असले, तरी प्रत्यक्ष ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष सुरूच आहे.
उजनी धरण जवळ असूनही या गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल भटकंती करावी लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.






