Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

माथेरानमध्ये विजेच्या समस्यांवर तोडगा; महावितरणने दिले एक महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन

महावितरणने माथेरानमधील वीज समस्यांवर एक महिन्यात उपाय करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठिय्या आंदोलन स्थगित केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 15, 2025 | 07:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

माथेरान शहरात सुरू असलेल्या वीज खंडिततेच्या समस्येवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठिय्या आंदोलन पुकारले होते. सततच्या वीजपुरवठा अडचणीमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटक हैराण झाले होते. मनसेच्या आंदोलनाची दखल घेत महावितरण कंपनीने लेखी आश्वासन देत नेरळ-माथेरान घाट रस्त्यावरील विजेची कामे पुढील एक महिन्यात पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, माथेरान शहरात भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याच्या कामासाठी दोन प्रस्तावांना अधीक्षक अभियंता कार्यालयाकडून मंजुरी मिळाली आहे. यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीकडून मिळाल्यावर कामे तातडीने सुरू केली जातील. त्यामुळे मनसेने आपले ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

Thane News: ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एका दिवसात 665 बॅनर्स आणि होर्डिंग्जवर कारवाई

माथेरानमध्ये एप्रिल व मे महिन्यात पर्यटन हंगाम असतो. मात्र या काळात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, स्थानिक व्यवसायिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. शहरातील वीज रोहित्र उघड्यावर असल्यामुळे आणि घाटमधील विजेच्या तारा झाडांमुळे तुटल्याने पुरवठा वारंवार खंडित होतो.

या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष संतोष कदम यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख कार्यकर्ते भूषण सातपुते, आसिफ खान, संदीप कोष्टी, सुरेश कळंबे आणि अन्य कार्यकर्त्यांनी महावितरणच्या माथेरान येथील कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाला माजी मराठा समाज अध्यक्ष बिना कदम यांनीही पाठिंबा दिला.

Crime News: सेवानिवृत्त सुभेदाराकडून अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

सहायक अभियंता सचिन आटपाडकर आणि कर्जत उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधत समाधानकारक उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नेरळ-माथेरान घाटातील कामे १५ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येतील. यासाठी दर मंगळवारी नियोजितपणे वीज पुरवठा बंद ठेवून दुरुस्ती केली जाईल. तसेच शहरातील उघड्या वीज रोहित्रांना बंदिस्त करण्यासाठी लागणारे बॉक्स माथेरानमध्ये पोहोचले आहेत. महावितरणच्या लेखी आश्वासनामुळे ठिय्या आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले असून, आता प्रत्यक्ष कामाच्या अंमलबजावणीकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Solution to electricity problems in matheran

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 07:40 PM

Topics:  

  • Mahavitaran Department
  • Matheran

संबंधित बातम्या

National Green Tribunal कडून माथेरान प्रदूषण प्रकरणी नोटीस; घोड्यांच्या लिदीवर उत्तरासाठी दोन आठवड्यांची मुदत
1

National Green Tribunal कडून माथेरान प्रदूषण प्रकरणी नोटीस; घोड्यांच्या लिदीवर उत्तरासाठी दोन आठवड्यांची मुदत

Matheran News: नेरळ–माथेरान नॅरोगेज मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग; मिनीट्रेन टीसीकडून आग विझवण्याचे प्रयत्न
2

Matheran News: नेरळ–माथेरान नॅरोगेज मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग; मिनीट्रेन टीसीकडून आग विझवण्याचे प्रयत्न

Matheran News : कर्जत–नेरळ–माथेरान मार्गावर मोठा अपघात टळला; मिनीबसचा गियर बॉक्स निकामी, ४५ प्रवाशांचे प्राण वाचले
3

Matheran News : कर्जत–नेरळ–माथेरान मार्गावर मोठा अपघात टळला; मिनीबसचा गियर बॉक्स निकामी, ४५ प्रवाशांचे प्राण वाचले

Raigad News: माथेरान पर्यटन हंगामात मिनी ट्रेनवर ताण! फेऱ्या वाढवण्याची नागरिकांची मागणी
4

Raigad News: माथेरान पर्यटन हंगामात मिनी ट्रेनवर ताण! फेऱ्या वाढवण्याची नागरिकांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.