अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार (फोटो- istockphoto)
पिंपरी: सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदाराने १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी स्थानिकांनी त्याला पकडून मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. बोपखेले येथे रविवारी (दि. १३ एप्रिल) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. लाला मोहम्मद शेख (६५, रा. रामनगर, बोपखेल) असे गुन्हा दाखल झालेल्या सेवानिवृत्त सुभेदाराचे नाव आहे.
पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने याप्रकरणी सोमवारी (दि. १४ एप्रिल) दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा सैन्य दलातील सेवानिवृत्त सुभेदार असून तो बोपखेले येथे भाडेतत्वावर राहण्यास आहे. त्याची पत्नी आणि मुले दुसऱ्या ठिकाणी राहतात.
दरम्यान, शेख हा त्याच्या खोलीत पीडीत १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत होता. याबाबत स्थानिक नागरिकांना माहिती मिळाली. त्यांनी शेख याला पकडून मारहाण केली. तसेच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाणीत जखमी झाल्याने शेख याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांनी शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
ट्रिपल सीट जाताना पाय लागला अन् दोन गट भिडले
चिखली मधील साने चौकात दोन गट आपसात भिडले. दोन्ही गटातील आरोपींनी एकमेकांवर कोयत्याने वार केले. तसेच कोयते हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (१३ एप्रिल) रात्री साडेनऊ वाजता साने चौक, चिखली येथे घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
गणेश अंकुश राख (२४, चिखली) यांच्या फिर्यादीनुसार ऋषी लहाने, योगेश लहाने, अक्षय सपकाळ, अजय शामराव सोनावणे (२६), रोहन बाळासाहेब सावंत (२१, चिखली) आणि इतर चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी गणेश हे मित्रासोबत केक आणण्यासाठी साने चौकात गेले होते. त्यावेळी आरोपी ऋषी हा दुचाकीवरून ट्रिपल सीट जात होता. त्याचा गणेश यांना पाय लागल्याने ते चौकातच थांबले. त्यावेळी त्यांच्यात भांडण झाले. ऋषी याने इतर आरोपींना बोलावून घेत गणेश यांना मारहाण करत कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. गणेश यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोन्याची साखळी आरोपींची चोरून नेली.
बॅटने हल्ला करून महिलेस गंभीर दुखापत
मुलांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून सुरू झालेल्या भांडणाचे पर्यवसान महिलेस बॅटने मारहाण करून गंभीर दुखापत करण्यात झाले. या प्रकरणी थेरगाव येथील तिघांविरुद्ध काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास संदिपनगर, थेरगाव येथे घडली.