Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काही भटकती आत्मांनी महाराष्ट्र कायम अस्थिर ठेवले; आता ते देश अस्थिर करण्याच्या प्रयत्नात; पंतप्रधान मोदींची नाव न घेता शरद पवारांवर टीका

  • By युवराज भगत
Updated On: Apr 29, 2024 | 08:57 PM
Prime Minister Narendra Modi criticizes Sharad Pawar without naming him

Prime Minister Narendra Modi criticizes Sharad Pawar without naming him

Follow Us
Close
Follow Us:
पुणे : राज्यात काही भटकती आत्मा आहे, त्यांनी राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण केली आहे. राज्यातच नाही तर घरातही अस्थिरता निर्माण केली आहे. आता ही भटकती आत्मा देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे, अशी टिका पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.
पुण्यातील रेसकाेर्स येथे माेदी यांची सभा
पुणे  जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यातील रेसकाेर्स येथे माेदी यांची सभा पार पडली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी कॉंग्रेस आणि भाजपच्या सरकारच्या कामांची तुलना केली. तसेच शरद पवार, राहुल गांधी यांचे नाव न घेता टिका केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसेचे अमित ठाकरे, चंद्रकांत पाटील, पुणे शहर लाेकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे, शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे शहरातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रात अशीच एक भटकती आत्मा
महाराष्ट्र राज्याने अनेक वर्ष राजकीय स्थिरता पाहिली आहे. परंतु काही लाेकांची स्वप्न-ईच्छा पूर्ण होत नाही, अशी काही  भटकती आत्मा असतात. त्यांची ईच्छा पुर्ण हाेत नाही ते मग दुसऱ्यांचे बिघडवितात. महाराष्ट्रात अशीच एक भटकती आत्मा आहे. या आत्म्याने ४५ वर्षांपूर्वी महत्वाकांक्षांसाठी खेळ सुरु केला. त्यातून महाराष्ट्र हा अस्थिर झाला. त्या आत्म्यामुळे अनेक मुख्यमंत्री त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. तो आत्मा कुटुंबातही तेच करीत आहे.
या आत्माकड़ून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न
राज्यात १९९५ साली भाजप शिवसेना सरकार आले. तेव्हाही हा आत्मा हे राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत हाेते. याच आत्म्याने १९९९ साली महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या काैलाचा अपमान केला. आता हा आत्मा राज्यातच नाही तर देशांत अस्थिरता निर्माण करीत आहे. त्यांना दूर करून स्थिर सरकार निर्माण केले पाहिजे’’ अशी टिका माेदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली.
कॉंग्रेसवर मोदी यांनी जोरदार टिका केली. ‘‘कॉंग्रेसच्या कालावधीत देशातील अर्धी लोकसंख्या ही मूलभूत सुविधांपासून वंचित राहीली हाेती. आम्ही गेल्या दहा वर्षांत या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या काळात मुंबई – पुण्यासारख्या शहरांसह अनेक शहरांत दहशतवादी बॉम्बस्फोट घडवित होती. आता ते होत नाही असा प्रकार घडला तर मी घरात घुसु शकताे हे लक्षात आल्याने दहशतवादी कारवाया थांबल्या आहेत. काॅंग्रेसला या देशात धर्माच्या आधारावर आरक्षण द्यायचे आहे. कर्नाटक हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
कर्नाटकात मुस्लीमांना धर्माच्या आधारावर आरक्षण
या कर्नाटकात काॅंग्रेसने मुस्लीमांना धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. तो न्यायालयाने अमान्य केल्यानंतर त्यांनी एकाच रात्री सर्व मुस्लीमांना ओबीसी ठरवित आरक्षण दिले. याप्रकारे त्यांनी ओबीसींना घटनेने दिलेल्या अारक्षणावर दराेडा टाकला अाहे. याचप्रकारे त्यांना देशभरात आरक्षण द्यायचे आहे. डाॅ. बाबासाहेब अांबेडकर, घटनेने एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी यांना दिलेले आरक्षण काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे, त्यांचा हा हेतू मी यशस्वी हाेऊ देणार नाही’’ अशी टिका पंतप्रधान माेदी यांनी केली.
चाैकट
माेदी यांची गॅरंटी बाेल
– ‘‘ वयाची सत्तर वर्ष पूर्ण झालेल्या नागरीकांच्या औषधाचा खर्च केंद्र सरकार करणार ’’
– ‘‘ देशाला ई-व्हेईकल, सेमी कंडक्टर, हायड्राेजन उर्जा निर्मितीचे हब करणार’’
– ‘‘ दहा वर्षांत केंद्र सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवले  आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई केली’’
– ‘‘ करपात्र रक्कमेची मर्यादा वाढवून, रेरा कायदा, आयुषमान भारत, जनऔषधी केंद्रासारख्या याेजनांमुळे गरीब, मध्यमवर्गीयांना दिलासा दिला.’’
– ‘‘ पायाभूत सुविधाबाबत काॅंग्रेस पेक्षा दसपट खर्च भाजप सरकारने केला.’’
– ‘‘ पालखी महामार्ग, समृद्धी महामार्गानंतर राज्यात देशातील पहीली बुलेट ट्रेन धावणाार’’
– ‘‘ देशांत युवा उद्याेजक तयार करण्यासाठ स्टार्ट अप याेजना राबविली यात सव्वा लाखाहून अधिक उद्याेजक तयार झाले’’
कॉंग्रेसच्या युवराजला काय माहिती?
पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणात राहुल गांधी यांच्या नावाचा उल्लेख युवराज असा करीत, त्यांच्यावर टिका केली. ते म्हणाले, ‘‘कॉंग्रेस आघाडीकडे विकासाचे मॉडेल काय आहे? युवराजाला गरीबी कशी दूर करायची? विकसित भारत कसा होतो? त्याचे उत्तर देता येत नाही. त्यांना देशात खतरनाक असलेला लायसेन्स कोटा आणायचा आहे. युवराजाच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्यापक्षातील युवा कार्यकर्ते काॅंग्रेसला रामराम करीत पक्ष सोडत आहे.’’

Web Title: Some wandering spirits in state kept state unstable they are now trying to destabilize country pm narendra modi criticizes sharad pawar without naming him nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2024 | 08:34 PM

Topics:  

  • Deputy Chief Minister Ajit Pawar
  • Prime Minister Narendra Modi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.