Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Australia Uranium Deal: चीनची होणार जळफळाट,ऑस्ट्रेलिया देणार भारताला युरेनियम; दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचा करार

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या या ऐतिहासिक अणुऊर्जा करार झाला आहे. अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आणि 'क्रिटिकल अर्थ मिनरल कॉरिडॉर'शी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. याचा भारताला कसा फायदा होणार जाणून घ्या.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 10, 2026 | 11:50 AM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • चीनची होणार जळफळाट
  • ऑस्ट्रेलिया देणार भारताला युरेनियम
  • दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचा करार
India Australia Uranium Deal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियाने एका ऊर्जा सुरक्षा करारावर स्वाक्षरी केली. यामुळे शांततापूर्ण हेतूंसाठी ऑस्ट्रेलियातून भारतात युरेनियम आयात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या महत्त्वपूर्ण करारामुळे भारताची स्वच्छ ऊर्जेची उद्दिष्ट्ये अधिक मजबूत होतील आणि ऊर्जा क्षेत्रातील परस्पर सहकार्य अधिक दृढ होईल. वार्षिक नेत्यांच्या शिखर परिषदेत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत या कराराची घोषणा करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन्ही देशांनी अणुऊर्जा क्षेत्रात एक महत्वपूर्ण कयार केला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियातून भारताला युरेनियमचा पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा होईल आणि आमच्या स्वच्छ ऊर्जेच्या उद्दिष्टांना अधिक बळ मिळेल. एका संयुक्त निवेदनानुसार, ऑस्ट्रेलिया आणि भारताने ‘ऑस्ट्रेलिया-भारत अणुसहकार्य करार २०१५’ अंतर्गत ऑस्ट्रेलियातून भारताला युरेनियमच्या निर्यातीसाठी आवश्यक प्रशासकीय व्यवस्था अंतिम केली आहे.

Share Market Today: शेअर बाजारात तेजीची शक्यता! तज्ज्ञांनी खरेदीसाठी सुचवले ‘हे’ दमदार शेअर्स

युरेनियमचा वापर केवळ शांततापूर्ण उद्देशांसाठीच

युरेनियमची निर्यात केवळ शांततापूर्ण उद्देशांसाठीच केली जाईल आणि ती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या (आयएईए) सुरक्षा उपायांच्या अधीन असेल. याव्यतिरिक्त, दोन्ही देशांनी पश्चिम आशियातील परिस्थिती आणि त्याचा जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी व वस्तूंच्या किमतींवर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी खुल्या बाजारपेठा आणि नियमांवर आधारित व्यापाराप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली.

ऊर्जा पुरवठा अखंडितपणे सुरू राहील

भारताला द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) पुरवठ्यामधील ऑस्ट्रेलियाची महत्त्वाची भूमिका आणि ऑस्ट्रेलियाला द्रव इंधन व पेट्रोलियम संबंधित उत्पादनाच्या पुरवठ्यामधील भारताची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखून, दोन्ही बाजूंनी अखंडित ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करण्याचा आणि दोन्ही देशांमधील ऊर्जा व्यापार व गुंतवणूक वाढवण्याचा निर्धार केला. याव्यतिरिक्त, भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रादेशिक सहकार्य मजबूत करून, ऊर्जा संक्रमणाला गती देऊन, नवीकरणीय ऊर्जा आणि कमी-कार्बन इंधनांना प्रोत्साहन देऊन, आणि सपूर्ण ऊर्जा मूल्य साखळीमध्ये अधिक गुंतवणुकीला प्रोत्साहित करून ऊर्जा पुरवठा साखळी आणखी मजबूत करण्याचा निर्धार केला, व्यापक धोरणात्मक भागीदारीवर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया है चैतन्यशील लोकशाही देश आणि महत्त्वाचे इंडो-पैसिफिक भागीदार असल्याने, त्यांची दृष्टी समान आहे आणि त्याव्यात गाढ परस्पर विश्वास आहे.

ऑस्ट्रेलियाची ५०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक

गुरुवारी मेलबर्न येथे झालेल्या ‘इंडिया ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम’ आणि ‘इकॉनॉमिक रोडमॅप बिझनेस रिसेप्शन ‘मध्ये मोदींनी सहभाग घेतला. ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या पेन्शन फंड, ऑस्ट्रेलियन सुपरनेही भारतात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींनी लिहिले, ‘मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियनसुपरचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पॉल श्रोडर यांनी जाहीर केलेल्या ५०० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीचे भारत स्वागत करतो. भारताच्या विकास आणि सुधारणांच्या मार्गावरील जागतिक विश्वासाचे है आणखी एक उदाहरण आहे. तसेच, आपली वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था जागतिक गुंतवणूकदारांना देत असलेल्या प्रचंड संधींचेही हे द्योतक आहे.”

दुर्मिळ खनिजांबाबत मोठी घोषणा

दुर्मिळ खनिजांबाबत एक मोठी घोषणा करताना पंतप्रधान मोदींनी सांगितले की, दोन्ही देश ‘क्रिटिकल अर्थ मिनरल कॉरिडॉर’वर काम करतील. यामुळे दुर्मिळ खनिजांवरील चीनच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसेल. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, दोन्ही देशांमध्ये अणुऊर्जा क्षेत्रात एक महत्वपूर्ण करार झाला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाकडून भारताला यूरेनियम पुरवठ्याचा मार्ग मोकळा होईल आणि स्वच्छ ऊर्जेच्या उद्दिष्टांना नवी चालना मिळेल.

Todays Gold-Silver Price: सोन्या-चांदीच्या किमतीत चढउतार सुरुच; 24 कॅरेटचा भाव वाचून बसेल धक्का, जाणून घ्या सविस्तर

Web Title: Australia agrees to supply uranium to india historic deal between the two nations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Australia
  • Business News
  • Marathi News
  • narendra modi
  • Prime Minister Narendra Modi
  • Uranium

संबंधित बातम्या

दारू कंपन्यांना ‘FSSAI’ चा मोठा झटका! व्हिस्की, बिअरमध्ये अनधिकृत फ्लेवरचा वापर; अनेक बड्या ब्रँड्सना नोटीस
1

दारू कंपन्यांना ‘FSSAI’ चा मोठा झटका! व्हिस्की, बिअरमध्ये अनधिकृत फ्लेवरचा वापर; अनेक बड्या ब्रँड्सना नोटीस

PM Narendra Modi : ‘दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर प्रहार…’, मेलबर्नमधील भाषणात मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा केला उल्लेख
2

PM Narendra Modi : ‘दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर प्रहार…’, मेलबर्नमधील भाषणात मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा केला उल्लेख

PM Modi in Australia: भारत-ऑस्ट्रेलिया भागीदारीत ‘शिक्षण’ बनला मजबूत स्तंभ; आता बेंगळुरूनंतर ‘या’ शहरांमध्ये सुरू होणार कॅम्पस
3

PM Modi in Australia: भारत-ऑस्ट्रेलिया भागीदारीत ‘शिक्षण’ बनला मजबूत स्तंभ; आता बेंगळुरूनंतर ‘या’ शहरांमध्ये सुरू होणार कॅम्पस

India Australia Agreement: भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांना नवे बळ; अणुऊर्जा, संरक्षण, व्यापार आणि अंतराळ क्षेत्रात ऐतिहासिक करार
4

India Australia Agreement: भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांना नवे बळ; अणुऊर्जा, संरक्षण, व्यापार आणि अंतराळ क्षेत्रात ऐतिहासिक करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.