Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिक्षकांसाठी गावकरी राहिले उभे; शिक्षकांच्या बदली रद्दसाठी सोंडोली ग्रामस्थांनी प्राथमिक शाळेला ठोकले टाळे

शाहुवाडी येथील ग्रामस्थांनी प्राथमिक शाळेतील शिक्षकाची बदली रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी शाळेला टाळे ठोकण्यात आले आहेत. सर्व ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी याला प्रतिसाद दिला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 23, 2024 | 06:32 PM
Shahuwadi Primary School closed

Shahuwadi Primary School closed

Follow Us
Close
Follow Us:

शाहुवाडी : सोंडोली (ता. शाहुवाडी) येथील ग्रामस्थांनी प्राथमिक शाळेतील शिक्षकाची बदली रद्द करण्यात यावी. या मागणीसाठी शाळेला टाळे ठोकण्यात आले आहेत. अनेकदा प्रशासनाकडे या बाबतीत निवेदने देऊन त्याचा पाठपुरावा करुनदेखील सबंधित शिक्षकाची बदली रद्द करण्यात आलेली नाही. ही मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.

सोंडोली येथे पहिली ते सातवीपर्यंत सात वर्ग असून या शाळेची पटसंख्या ८५ इतकी आहे. कोरोनामुळे त्या दोन वर्षांच्या काळात विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही खालावली होती. मात्र त्यानंतरच्या काळात शिक्षक म्हणून नेमणूक झालेल्या कानिफ अंकुश काकडे या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अमर्याद कष्ट घेतले. यातून विद्यार्थ्यांची चांगली प्रगती झाली. यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमधूनदेखील काकडे या शिक्षकाबद्दल आत्मीयता वाढली. मात्र ऐच्छिक बदली दरम्यान त्यांची बदली झाली. ग्रामस्थांनी त्यांना परत याच शाळेत थांबण्याची विनंती केली. काकडे यांनी देखील या विनंतीला मान देत आपली या शाळेत थांबण्याची तयारी असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तशा स्वरूपाचा पाठपुरावा सूरू केला.

जिल्हा व तालुका प्रशासनाला लेखी निवेदने देण्यात आली. मात्र प्रशासनाकडून त्याची कोणतीच दखल घेतली गेली नाही. अखेर येथील ग्रामस्थांनी या मागणीसाठी शाळेला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला. आता जोपर्यंत काकडे यांची बदली रद्द होत नाही. तोपर्यंत शाळेचे टाळे उघडणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी सरपंच भिमराव पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, शाळा समितीअध्यक्ष संजय नेर्लेकर, उपाध्यक्ष सुरेखा चोरगे, हणमंत जाधव, तटांमुक्त अध्यक्ष भिमराव पाटील, सुरज सांवत, शिवाजी चोपडे, शिवाजी पाटील, कमलेश पाटील, आण्णा पाटील, बाळु म्होळे, राणी पाटील, कमल चोपडे, आनदा पाटील, रुपाली म्होळे, जिजा पाटील, तानाजी पाटील, बाळू चोपडे, प्रकाश चोपडे, शितल कुभांर व पालकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Sondoli villagers boycotted the primary school to cancel the transfer of teachers nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 06:32 PM

Topics:  

  • sangli news
  • Shahuwadi News

संबंधित बातम्या

Kolhapur News: वन्यप्राण्यांची दहशत आणि तरुणांचे स्थलांतर; शाहुवाडीच्या जखमांवर कोण घालणार फुंकर?
1

Kolhapur News: वन्यप्राण्यांची दहशत आणि तरुणांचे स्थलांतर; शाहुवाडीच्या जखमांवर कोण घालणार फुंकर?

Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई
2

Sangli : “जिल्हा परिषदसाठी शिंदे गटाने कंबर कसली, महापौरही शिंदेंच्याच मर्जीचा”- शंभूराज देसाई

द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांचा उद्या मोर्चा, विविध मगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर देणार धडक
3

द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांचा उद्या मोर्चा, विविध मगण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर देणार धडक

Sangali Municipal Election 2026: ‘जय-वीरू’ची जादू! विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांच्या एकजुटीने भाजपचा वारू रोखला
4

Sangali Municipal Election 2026: ‘जय-वीरू’ची जादू! विशाल पाटील आणि विश्वजीत कदमांच्या एकजुटीने भाजपचा वारू रोखला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.