
रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर, केवळ ५ हजार हेक्टरवरच लागवड; रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र वाढले
Amaravati News In Marathi : अमरावती जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी यंदा २ लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात आतापर्यंत फक्त पाच हजार हेक्टरवरच पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. पावसामुळे जमिनीत ओलावा अधिक आहे. मंडीचा पूर्णतः प्रारंभ न झाल्याने शेतकरी पेरणीपासून दूर आहेत. त्यामुळे हंगामात उशीर होत आहे आणि कृषी नियोजनावर परिणाम दिसून येत आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदा रब्बी हंगामात जिल्ह्यात एकूण २.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी सुमारे ५७ ते ५८ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. आतापर्यंत केवळ हरभरा, गहू व ज्वारी या पिकांच्या मर्यादित क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. सध्या हरभऱ्याला सर्वाधिक पसंती मिळत असून, त्याची पेरणी हळूहळू काढते आहे. थंडीचा प्रभाव वाढताच गव्हाची पेरणीही वेग घेईल, अशी शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणी-वाली विंडी, बियाणे उपलब्धता, सिंचन व्यवस्थापन आणि योग्य खत वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांना बियाणे आणि खत पुरवठा नियमित असला तरी, वीजपुरवठ्याची अनियमितता आणि मजूरटंचाई यामुळे शेतमजुरी व सिंचनाच्या कामात अडचणी येत आहेत.
ऑक्टोबरअखेरपर्यंत झालेल्या सततच्या पावसामुळे जमिनीत ओलावा कायम आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही नांगरणी व पेरणीसाठी प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत रात्रीच्या तापमानात घट
होऊन थंडीचा जोर चावेल, ज्यामुळे पेरणीचा वेग वाढेल, अशी अपेक्षा आहे.
चंदा जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये पाणी मुचलक साठा असल्याने रब्बी हंगामासाठी सिंचन पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होणार नाही. मात्र, वीजपुरवठा अनियमित असल्याने मोटारींच्या वापरात अडथळे येण्याची शक्यता आहेत.
शेतमजुराचा तुटवडा बाढल्याने लागवड व सिंचनाच्या कामात उशीर होत आहे. गावाबाहेरील मजूर परत न आल्याने आणि दैनंदिन मजुरीदर वाढल्याने शेतक-यांवर खर्चाचा बोजा वाढला आहे. तसेच मजुरीचे दर वाढल्याने मजुरही मिळेना, अशी स्थिती शेतकऱ्यांसमोर आहे.
जमिनीत अजूनही ओलावा असल्याने पेरणी मंदावली आहे. बडीचा जोर वाढताच पेरणीचा देग वाढेल, हरभरा व गहू या पिकांना सर्वाधिक प्रतिसाद मिळतो आहे. सिंचनासठी पाणी उपलब्ध आहे. मात्र, शेतकन्यांनी नियोजनपूर्वक पेरणी करावी, अशी प्रतिक्रिया अमरावतीचे जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांनी दिली.