Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात पिकवली आहे. या परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 08, 2026 | 05:00 AM
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
  • स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित
  • भीमाशंकर स्ट्रॉबेरी महोत्सव आयोजित करण्याचा मानस
मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी मोठ्या प्रमाणात पिकवली आहे. या परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव आणि तालुका कृषी विभाग, आंबेगाव यांच्या समन्वयातून मोठा दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने पुढाकार घेत शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करून प्रति किलो १५५ रुपये हमीभाव निश्चित केला आहे. या उपक्रमातून शेतकरी आणि विद्यार्थ्यांना दुहेरी लाभ मिळत आहे.

 

भीमाशंकर परिसरातील दुर्गम व डोंगराळ भागातील आदिवासी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. मात्र तीर्थक्षेत्रातील मंदिर काही महिन्यांपर्यंत बंद राहिल्याने पर्यटकांची वर्दळ कमी झाली आणि स्थानिक बाजारपेठ ठप्प झाली. परिणामी स्ट्रॉबेरी विक्रीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव आणि तालुका कृषी विभाग, आंबेगाव यांनी समन्वय साधत शेतकऱ्यांची स्ट्रॉबेरी थेट खरेदी करण्याचा निर्णय घेतला. प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्या पुढाकाराने प्रकल्पांतर्गत कार्यरत मध्यवर्ती स्वयंपाकगृहामार्फत स्ट्रॉबेरीची खरेदी सुरू करण्यात आली.

स्ट्रॉबेरी हे नाशवंत फळ असल्याने पुणे-मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत घेऊन जाणे लहान शेतकऱ्यांना परवडत नव्हते. या अडचणीवर उपाय म्हणून थेट खरेदीची व्यवस्था करण्यात आली. खरेदी केलेली स्ट्रॉबेरी आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांच्या आहारात समाविष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हमी बाजारपेठ उपलब्ध झाली असून, विद्यार्थ्यांना ‘व्हिटॅमिन-सी’युक्त ताजी व पौष्टिक फळे मिळू लागली आहेत.

हे सुद्धा वाचा : कोल्हापुरकरांनो, पाणी जपून वापरा; 2 दिवस होणार अपुरा पाणीपुरवठा

भीमाशंकर स्ट्रॉबेरी महोत्सव आयोजित करणार

तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना आधुनिक लागवड तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन, खत व्यवस्थापन व काढणीनंतरच्या प्रक्रियेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. आदिवासी विकास विभागामार्फत लागवडीसाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार, यंदा १७८ शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून, प्रत्येक शेतकऱ्याला ५ गुंठ्यांसाठी सुमारे ४७ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. प्रशासकीय पाठबळामुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक शेतकरी नव्या उत्साहाने स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळले आहेत. भीमाशंकर परिसराला स्ट्रॉबेरी उत्पादनाचे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी तसेच या उत्पादनाला व्यापक ओळख मिळवून देण्यासाठी ‘भीमाशंकर स्ट्रॉबेरी महोत्सव’ आयोजित करण्याचा मानस प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी व्यक्त केला आहे.

“शासन आणि प्रशासनाने योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे आमचे पीक वाया जाण्यापासून वाचले आणि मोठे आर्थिक नुकसान टळले. कृषी विभागाचे तांत्रिक मार्गदर्शन व प्रकल्प कार्यालयाच्या खरेदी उपक्रमामुळे आम्हाला हमी बाजारपेठ मिळाली आहे. या पाठबळामुळे शेतकरी नव्या उत्साहाने शेतीकडे वळत आहेत.” — अर्जुन भारमळ, प्रगतशील शेतकरी, फुलवडे.

Web Title: The administration has helped strawberry farmers in the bhimashankar area

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 05:00 AM

Topics:  

  • bhimashankar
  • CM Devedra Fadnavis
  • Farmers

संबंधित बातम्या

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
1

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
2

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
3

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
4

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.