central railway
मुंबई – सध्या सणासुदीचे दिवस आहे. गणपतीचा सण झाल्यानंतर आता दसरा, दिवाळी तसेच छटपूजा आगामी काळात सण येणार आहेत. त्यासाठी गावी जाण्यासाठी तसेच फिरायला जाण्यासाठी लोकांचे आत्तापासूनच नियोजन सुरु आहे. प्रवासाचा नियोजन, तिकिट बुक प्रवास कसा करायचा यावरुन लोकांची लगबग सुरु असताना, आता मध्य रेल्वेनं (Central Railway) प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. सणासुदीच्या काळात मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेकडून दसरा, दिवाळी आणि छटपूजा सणनिमित्त ३० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. (special trains from central railway for festivals like dussehra diwali chhath pooja from where and at what time will the train leave)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर द्विसाप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (२० फेऱ्या)
गाडी क्र. 02139 सुपरफास्ट स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. १९.१०.२०२३ ते २०.११.२०२३ या कालावधीत सोमवार आणि गुरुवारी ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १५.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. गाडी क्र. 02140 सुपरफास्ट स्पेशल दि. २१.१०.२०२३ ते २१.११.२०२३ या कालावधीत मंगळवार आणि शनिवारी १३.३० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. (Special trains from Central Railway for festivals like Dussehra, Diwali, Chhath Puja; From where and at what time will the train leave)
गाड्या कुठं थांबा घेणार?
दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
संरचना: १६ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी क्लास आणि दोन जनरेटर व्हॅन.
२) नागपूर – पुणे साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल (१० फेऱ्या)
गाडी क्र. 02144 सुपरफास्ट स्पेशल दि. १९.१०.२०२३ ते १६.११.२०२३ या कालावधीत प्रत्येक गुरुवारी १९.४० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पुणे येथे पोहोचेल. गाडी क्र. 02143 सुपरफास्ट स्पेशल दि. २०.१०.२०२३ ते १७.११.२०२३ पर्यंत दर शुक्रवारी पुणे येथून १६.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
थांबे: वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन आणि उरूळी.
संरचना: १६ तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी क्लास आणि दोन जनरेटर व्हॅन.
आरक्षण: वरील विशेष ट्रेनसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. १४/१०/२०२३ रोजी सर्व प्रवासी आरक्षण केंद्र स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात येत आहे.