Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडिया आघाडीच्या हालचालींना वेग; थेट दिल्लीतून उद्धव ठाकरेंना निरोप, तातडीने होणार रवाना

  • By युवराज भगत
Updated On: Jun 05, 2024 | 05:27 PM
इंडिया आघाडीच्या हालचालींना वेग; थेट दिल्लीतून उद्धव ठाकरेंना निरोप, तातडीने होणार रवाना
Follow Us
Close
Follow Us:

India Alliance : लोकसभेचे निकाल लागल्यानंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांना सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांची मदत नक्कीच घ्यावी लागणार आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडी सत्तास्थापनेसाठी ती जुळवाजुळव करण्याच्या तयारीत दिसत आहे. कारण सत्ता स्थापनेसाठी तो मॅजिक फिगर गाठणे गरजेचे आहे. भाजपला देशात 240 जागा मिळाल्या आहेत, तर संपूर्ण इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे इंडिया आघाडी तो मॅजिक फिगर गाठण्यासाठी जुळवाजुळव करण्याची शक्यता आहे.

दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक थांबवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी बैठकीला यावं, अशी विनंती दिल्लीत असलेल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. त्यांचा निरोप ऐकल्यानंतर आता उद्धव ठाकरे हे सुद्धा दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एनडीए सरकार स्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत आहे. मग इंडिया आघाडीचे नेते एनडीएच्या या दाव्यातील हवा काढण्यात यशस्वी होतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीत याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

यंदा कोणत्याही पक्षाला बहुमत नाही
लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत कोणत्या एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळालेलं नाही. पण एनडीएला 290 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. देशात सरकार स्थापन करण्यासाठी 272 जागा आवश्यक आहेत. एनडीएकडे सध्या बहुमत आहे. पण भाजपकडे बहुमत नाही. याउलट आता एनडीएत लहान पक्षांची बार्गेनिंग पावर वाढली आहे. इंडिया आघाडीत कधी एकेकाळी राहिलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या एनडीएसोबत आहेत. पण इंडिया आघाडीकडून नितीश कुमार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले तर ते इंडिया आघाडीकडे येऊ शकतात. याशिवाय चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पार्टी हा पक्ष देखील इंडिया आघाडीत सहभागी झाला तर देशात मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मला लागणार ब्रेक
एकीकडे एनडीएकडून सरकार स्थापनेचा दावा केला जातोय. तर दुसरीकडे इंडिया आघाडीच्या गोटात जोरदार खलबतं सुरु आहेत. इंडिया आघाडीची आज बैठक बोलावण्यात आली आहे. दिल्लीत ही बैठक पार पडत आहे. या बैठकीचं उद्धव ठाकरे यांनासुद्धा निमंत्रण आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत हे दिल्लीला बैठकीला गेले आहेत. पण इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना या बैठकीला हजर राहण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी बैठक थांबवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नेमके काय खल होतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
इंडिया आघाडीच्या नेत्यांची ठाकरेंना विनंती काय?
तुम्ही बैठकीला या, अशी विनंती इंडिया आघाडीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी इंडिया आघाडीची बैठक थांबवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे दिल्लीत गेल्यानंतरच इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या विनंतीनंतर आता उद्धव ठाकरे दिल्लीला बैठकीसाठी रवाना होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सरकार स्थापनेबाबत चर्चा केली जाणार आहे. सरकार स्थापनेसाठी जागांची जुळवाजुळव कशी करायची? याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Speed up the movement of india alliance farewell to uddhav thackeray directly from delhi will leave immediately read in detail nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2024 | 05:27 PM

Topics:  

  • INDIA Alliance
  • Lok Sabha Election 2024
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?
1

Thackeray-Shinde Politics: मोठी बातमी! चाकणमध्ये ठाकरे-शिंदे गट एकत्र, नेमकं काय आहे प्रकरण?

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का
2

Maharashtra Politics: मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण केली उद्धव ठाकरेंची ती इच्छा; एकनाथ शिंदे गटाला बसला जोरदार धक्का

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश
3

Maharashtra Politics : नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का; माजी नगराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.