Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 16 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News : आरोग्य विभागाच्या राज्यस्तरीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; 100 हून अधिक रुग्णालयांचा समावेश

महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) सीसीएमपी अभ्यासक्रमधारक होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणीला विरोध दर्शविला जात आहे. या नोंदणी करण्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने राज्यभर बंदची हाक दिली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Sep 18, 2025 | 01:59 PM
KDMC News : आरोग्य विभागाच्या राज्यस्तरीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; 100 हून अधिक रुग्णालयांचा समावेश
Follow Us
Follow Us:
  • आरोग्य विभागाच्या राज्यस्तरीय बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • 500 हून अधिक डॉक्टर झाले सहभागी
  • 100 हून अधिक रुग्णालयांचा समावेश
 

कल्याण : महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) सीसीएमपी अभ्यासक्रमधारक होमिओपॅथिक डॉक्टरांची नोंदणीला विरोध दर्शविला जात आहे. या नोंदणी करण्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने राज्यभर बंदची हाक दिली आहे. याचपार्श्वभूमीवर पुकारलेल्या बंदला कल्याणमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कल्याणमधील शंभरहून अधिक रुग्णालयांनी 24 तास आपल्या उपचार सेवा बंद ठेवल्या असून 500 पेक्षा जास्त डॉक्टरांनी या संपात सक्रिय सहभाग घेतला. या एक दिवसीय लाक्षणिक संपामुळे कल्याण डोंबिवलीतील रुग्णालयांतील दैनंदिन वैद्यकीय सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसून आले.

आयएमएच्या कल्याण शाखेच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर यांनी सांगितले की, “या आंदोलनाचा भाग म्हणून आपत्कालीन सेवा देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. एमएमसी नोंदणीला आमचा ठाम विरोध आहे आणि हा लढा आम्ही यापुढे असाच चालू ठेवणार असल्याची माहिती कल्याण आय एम ए अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर यांनी दिली. तसेच राज्य शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यापुढे बेमुदत आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही असा देखील इशारा देण्यात आलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या काही दिवसांत आयएमएचे राज्यभरातील डॉक्टर मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजानंतर आता बंजारा समाज उतरला रस्त्यावर; आरक्षणासाठी काढला मोर्चा

दरम्यान कल्याणमधील आयएमएच्या डॉक्टरांनी मुरबाड रोड येथील आयएमए हॉल ते कल्याण तहसील कार्यालय आणि तिथून केडीएमसी मुख्यालय असा पायी लाँग मार्च काढला. डॉक्टरांच्या या शिष्टमंडळाने कल्याणचे तहसीलदार आणि KDMC आयुक्त यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

यावेळी आयएमए कल्याण अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, खजिनदार डॉ. तन्वी शहा, प्रेसिडेंट इलेक्ट डॉ. राजेंद्र लावणकर, डॉ.शुभांगी चिटणीस, डॉ. गोडबोले, डॉ. अमित धर्माधिकारी, डॉ. प्रदीप कुमार सांगळे, डॉ. विवेक भोसले, डॉ.विद्या ठाकुर, डॉ.प्रशांत खताळे, डॉ. विकास सुरंजे, डॉ. संदेश रोठे, यांच्यासह अनेक डॉक्टर सहभागी झाले होते.

राज्यातील सर्व शासकीय डॉक्टर आज एकदिवसीय संपावर; रुग्णसेवेवर होणार परिणाम

Web Title: Spontaneous response in kalyan to the state level bandh of the health department more than 100 hospitals included

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 01:53 PM

Topics:  

  • kalyan news
  • KDMC

संबंधित बातम्या

KDMC News: केडीएमसी आयुक्तांचा मुस्लिम समाजाला दिलासा; कल्याण-डोंबिवलीत तीन ठिकाणी कब्रस्तानासाठी जागा देण्याचे आश्वासन
1

KDMC News: केडीएमसी आयुक्तांचा मुस्लिम समाजाला दिलासा; कल्याण-डोंबिवलीत तीन ठिकाणी कब्रस्तानासाठी जागा देण्याचे आश्वासन

महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव! Kalyan चे डॉ. प्रशांत पाटील रेडिओलॉजिस्ट संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष
2

महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव! Kalyan चे डॉ. प्रशांत पाटील रेडिओलॉजिस्ट संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

KDMC तील स्वीकृत नगरसेवक निवडीचा तिढा कायम; ठाकरे गट आक्रमक, शहरातील १० ठिकाणी आंदोलनाचा इशारा!
3

KDMC तील स्वीकृत नगरसेवक निवडीचा तिढा कायम; ठाकरे गट आक्रमक, शहरातील १० ठिकाणी आंदोलनाचा इशारा!

KDMC News: महापालिका मुख्यालयातच स्वच्छतेचा बोजवारा! कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मृत कुत्र्याचे पिल्लू; KDMC अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
4

KDMC News: महापालिका मुख्यालयातच स्वच्छतेचा बोजवारा! कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ मृत कुत्र्याचे पिल्लू; KDMC अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.