statement has been sent to the police to take action against those who stole women's jewelry in Vadgaon Maval.
वडगाव मावळ : वडगाव मावळ पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये धूमस्टाईल दुचाकीवरून भरधाव जात रस्त्याने चाललेल्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उपद्रव पुन्हा वाढला आहे. शहरात सलग दोन दिवस सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार घडल्याने पायी फिरणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वडगाव शहरात मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी काही अज्ञात चोरटे दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील दागिने ओढण्याचे प्रयत्न करत आहेत. अशा या घटना एकाच आठवड्यात दोन ते तीन वेळा या घडल्या आहेत. तसेच चोरटे चपळाईने पळ काढत आहेत. वडगाव शहरातील मुख्य बाजारपेठ मार्गावर सीसीटीव्ही बसवण्यात आल्यानेही चोरटे खुलेआम दागिने हिसकवण्याचे प्रयत्न करत आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मंगळवारी (दि १८) रात्री घडलेल्या प्रकारात ढोरे (रा. शिवाजी चौक वडगाव मावळ यांच्या गळ्यातील न मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेण्याचा प्रकार घडला. महिलेने सतर्क दाखविल्याने अनर्थ टळला मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले.
या घटनेने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रशासनाने या ठिकाणी गस्त वाढवावी, विशेषतः आठवडे बाजार आणि रात्रीच्या वेळेस सुरक्षेसाठी अधिक पथके तैनात करावीत जेणेकरून महिलांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण होईल.अशी मागणी होत आहे
वडगाव शहरात मागील तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळी काही अज्ञात चोरटे दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील दागिने ओढण्याचे प्रयत्न हे एकाच आठवड्यात दोन ते तीन वेळा या घटना करून पळून जाण्याचे प्रकार घडत आहेत. वडगाव शहरातील मुख्य बाजारपेठ मार्गावर सीसीटीव्ही बसवण्यात आल्यानेही चोरटे खुलेआम दागिने हिसकवण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामुळे शहरातील महिला भगिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मोरया महिला प्रतिष्ठानच्या महिला पदाधिकाऱ्यांनी वडगाव मोहोळ पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील महिला भगिनींना आवाहन करण्यात आले आहे की, महिला भगिनींनी रात्रीच्या वेळी फेरफटका मारताना स्वतः ची काळजी घ्यावी आणि शक्यतो रात्रीच्या वेळी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या अध्यक्ष अबोली मयूर ढोरे यांनी केले आहे.
तसेच शहरातील बँक परिसर, शासकीय मुख्यालय, आठवडे बाजार, मंगल कार्यालय, रेल्वे स्टेशन, मुख्य बाजारपेठ रस्ता, मंदिर परिसर आदी प्रमुख ठिकाणी महिलांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या ठिकाणी गस्त वाढवावी, विशेषतः आठवडे बाजार आणि रात्रीच्या वेळेस सुरक्षेसाठी अधिक पथके तैनात करावीत जेणेकरून महिलांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण होईल.अशी मागणी मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिले आहे.