Photo Credit- Social Media कर्जत जामखेड नगरपंचायतीच्या उपाध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल
मुंबई : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये विधानसभेचे कामकाज सुरु झाले असले तरी आज अनेक सदस्यांनी सभागृहाला दांडी मारली आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने अनेक नेत्यांनी विधीमंडळामध्ये सहभाग घेतला नाही. सभागृह सुरु झाल्यानंतर केवळ सहा सदस्य उपस्थित होते. विधीमंडळाच्या आवारामध्ये शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
रोहित पवार यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी प्रशांत कोरटकर यांना अद्याप अटक झालेली नाही. ते म्हणाले की, “प्रशांत कोरटकर या सारख्या लोकांना अटक करायला इच्छाशक्ती असावी लागते. कोरटकरच्या बाबतीत सुरुवातीपासून आम्ही म्हणालो आहे की, लगेचच्या लगेच त्याला अटक करा. मात्र सरकारकडून त्यांना मुद्दाम पाठबळ दिलं जात आहे. त्यांना सरकार्य केलं जात आहे. आता कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कोरटकरला पकडण सोप नाही मात्र त्यासाठी इच्छाशक्ती लागेल,” असे स्पष्ट मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
रोहित पवार पुढे म्हणाले की, “महायुतीकडे कोरटकरला अटक करण्याची इच्छाशक्ती नाही. कोरटकर आणि सोलापूरकर हे खास लोक आहेत. भाजपच्या लोकांचे ते खास आहेत. म्हणून कुठेतरी या लोकांना पाठबळ दिले जात आहे. हे सरकारमध्ये असणारे जे नेते आहेत ते याच टुकार लोकांना पाठबळ देत आहेत. हेच आता म्हणावं लागेल,” अशी घणाघाती टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार म्हणाले की “सत्ताधारी नेते हे भाषण करत असताना शांतता राखली पाहिजे म्हणतात. आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे खास नेते अतिशय आक्रमक आणि वातावरण बिघडेल अशी वक्तव्य करतात. हा तात्या विंचू सारखा प्रकार झाला. वातावरण गरम करणारे हे जे लहान नेते आहेत ते फक्त एक बाहुली आहेत. त्या बाहुलीच्या मुखातून बोलणारे कोणी दुसरेच सत्तेतील नेते आहेत. महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, युवा अडचणींमध्ये आहेत. लोकांना हाताला काम आणि पोटाला अन्न नाही. शिक्षकांपासून शेतकऱ्यांपर्यंत आत्महत्या वाढल्या आहेत. या सर्व मुद्द्यांवर लक्ष जाऊ नये म्हणून मुद्दाम औरंगजेबाचा विषय काढला जातो,” असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यामध्ये सध्या औरंगजेबाच्या कबरीवर वातावरण तापले आहे. यावरुन नागपूरमध्ये दंगल देखील झाली. या मुद्द्यावर रोहित पवार म्हणाले की, “शेतकऱ्यांची आणि कष्टकरांच्या काही मागण्या आहेत. अधिवेशनामध्ये आम्ही सामान्य लोकांच्या काही मागण्या अधिवेशनामध्ये मांडल्या आहेत. तातडीने या सर्व मागण्या पूर्ण करणार असाल तर आम्ही कोणाचीही कबर काढायला आम्ही सुद्धा पाठिंबा देऊ. जर सामान्य लोकांचे विषय सुटणार असतील तर आम्ही पाठिंबा देऊ. फक्त वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि लक्ष विकेंद्रीयकरण करण्यासाठी हे विषय पुढे आणले जात आहेत,” असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे