कल्याण : आज पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेकांची नावे मतदार यादीत नसल्याचे दिसून आले. असाच प्रकार कल्याण पश्चिमेत उघडकीस आला असून कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात तब्बल एक लाख मतदारांची नावे गायब असून निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरीकांना बसला असल्याचा आरोप शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी केला आहे.
[read_also content=”सूर्या-सचिनसोबत या खेळाडूंनी बजावला मतदानाचा हक्क https://www.navarashtra.com/photos/along-with-suryakumar-yadav-sachin-tendulkar-these-players-exercised-their-right-to-vote-535816.html”]
याबाबत शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, आज मतदानाचा हक्क मी आणि माझ्या परिवाराने बजावला आहे. एकंदरीत प्रभागामध्ये फिरत असताना नागरिकांना त्रास झालेला दिसून येत आहे. निवडणूक आयोगाचा भोगंळ कारभार समोर येत असून प्रत्येक प्रभागात अडीच ते तीन हजार मते गायब असून ज्या लोकांनी मागच्या वेळेस ज्यांनी मतदान केले त्यांची नावे पूर्णपणे गायब आहेत. अतिशय भोगंळ कारभार निवडणूक अयोगाचा आहे. याला जे जबाबदार आहेत त्याच्यावर निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी अंदाजे एक लाख नावे गायब असल्याचे अभ्यासावरून दिसून येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पुढे तर प्रत्येक वॉर्डात मतदार आम्हाला बडबडत आहे. माझा मतदानाचा हक्क हिरवून घेतला आहे. हक्काच्या मतदराचे नाव नसल्याने त्यांचे मत नसते तेव्हा तो नाराज होतो. त्यांच्या कुटुंबातील दोन जणांची नावे आहेत. दोन जणांची नावे नाहीत ही जी परिस्थिती ही गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने अँक्शन प्लँन तयार करून येणाऱ्या निवडणूका लगेच लागतील. त्यांच्यासाठी डिलिटेड म्हणून शिक्के मारलेले आहेत त्याचे सर्व्हे करून तो माणूस तिथे राहतो. त्याचे नाव तातडीने समाविष्ठ झाले पाहिजे हि मागणी आहे.
[read_also content=”आमदार विश्वनाथ भोईर यांनी कुटूंबासोबत बजावला मतदानाचा हक्क https://www.navarashtra.com/maharashtra/mla-vishwanath-bhoir-exercised-his-right-to-vote-with-his-family-535794.html”]
मतदारांची नावे देखील मतदानासाठी लांबच्या मतदान केंद्रात आलेली आहेत. मोहन्यातील नावे ऊबर्डेला आलेली आहेत. टिटवाळ्यातील नावे डोंबिवलीत गेली आहेत. हा कुठला प्रकार आहे. नावामध्ये प्रिटिंग मिसेटेक आहे. डाटा आँपरेटर बसविलले शिक्षित होते का? असा सवाल रवी पाटील यांनी उपस्थित केला आहे.