Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्यात अचानक आग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

महालक्ष्मी एक्सप्रेस नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने धावत होती. ही रेल्वे लोणावळ्याच्या मंकी हिल परिसराजवळ आली तेव्हा रेल्वेच्या B1 या डब्यात अचानक धुराचे लोट पसरू लागले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 28, 2026 | 03:26 PM
महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्यात अचानक आग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

महालक्ष्मी एक्सप्रेसच्या डब्यात अचानक आग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

Follow Us
Follow Us:

कर्जत : महालक्ष्मी एक्सप्रेसच्या एका डब्यामध्ये अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही रेल्वे कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकाजवळ असलेल्या ‘मंकी हिल’ परिसरात ही रेल्वे आली तेव्हा आग लागल्याचे सांगण्यात आले.

महालक्ष्मी एक्सप्रेस नेहमीप्रमाणे प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने धावत होती. ही रेल्वे लोणावळ्याच्या मंकी हिल परिसराजवळ आली तेव्हा रेल्वेच्या B1 या डब्यात अचानक धुराचे लोट पसरू लागले. मध्यरात्रीची वेळ असल्याने बहुतांश प्रवासी झोपेत होते. अचानक फायर अलार्मचा मोठ्याने आवाज आल्याने प्रवाशांना जाग आली. डब्यात धूर साचल्याचे दिसताच प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. मात्र, रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांनी यावर तातडीने कार्यवाही केल्याचे दिसून आले.

पाळण्यात बसून ज्येष्ठाचा लोकल प्रवास ! राखीव जागा असूनही आसन मिळेना; रेल्वेच्या गर्दीचे भीषण वास्तव चव्हाट्यावर

प्राथमिक अंदाजानुसार, डब्यातील विद्युत यंत्रणेत शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. फायर अलार्म वेळेवर वाजल्यामुळे आणि रेल्वे प्रशासनाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.

आगीच्या कारणाचा शोध सुरु

महालक्ष्मी एक्सप्रेसच्या B1 या डब्यात ही अचानक आग लागली. ही आग लागताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. मात्र, याच्या नेमक्या कारणाचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जात आहे.

रुग्णालयाच्या ICU विभागात भीषण आग

दुसऱ्या एका घटनेत, बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली. काही दिवसांपूर्वी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. मुझफ्फरपूरच्या सर्वात मोठ्या प्रसाद रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये ही आग लागल्याची माहिती दिली जात आहे. या भीषण आगीत 10 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Muzaffarpur Hospital Fire : मुझफ्फरपूरमधील रुग्णालयाच्या ICU विभागात भीषण आग; अनेक रुग्णांचा मृत्यू

Web Title: Sudden fire in mahalaxmi express coach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Fire Case

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.