
हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला सव्वा 11 कोटींचा दंड, नेमकं कारण काय?
राज्यात सन २०२५–२६ या ऊस गाळप हंगामाला १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. ऊस नियंत्रण आदेशानुसार ऊसगाळप करण्यासाठी साखर उत्पादकांनी साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना घेणे बंधनकारक आहे. असे असतानाही संबंधित कारखान्याने परवाना मिळण्याआधीच गाळप सुरू केल्याचे साखर आयुक्तालयाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे.
गाळप परवान्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना साखर आयुक्तालयाकडून सर्व साखर कारखान्यांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर येथील शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने २० ऑक्टोबर रोजी प्रादेशिक सहसंचालकांकडे ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, प्रस्तावास मंजुरी मिळण्याआधीच कारखान्याने ऊसगाळप सुरू केल्याचे निदर्शनास आले.
नियमभंगाच्या काळात गाळप
या नियमभंगाच्या काळात कारखान्याने एकूण २ कोटी २४ लाख २९९ टन उसाचे गाळप केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ऊस नियंत्रण आदेशानुसार प्रति टन ५०० रुपये या दराने दंड आकारण्यात येत आहे. त्यानुसार कारखान्यावर एकूण ११ कोटी २१ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कदमवाकवस्ती परिसरात अडीच एकर ऊस जळून खाक
लोणी काळभोर परिसरात ऊस जळीत घटनांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, अवघ्या २४ तासांत दुसरी गंभीर घटना घडल्याने शेतकरी वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी (दि. २३) लोणी काळभोर येथे सहा शेतकऱ्यांचा पाच एकर ऊस जळून खाक होऊन दहा लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असतानाच बुधवारी (दि. २४) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील गुजरवस्ती परिसरात अडीच एकर ऊस आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या आगीत संपत महादेव गुजर या शेतकऱ्यांचे सुमारे पाच लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. ते सुरतपट्टीलगत शेती करणारे शेतकरी आहेत. गुजर यांनी अडीच एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती. काही दिवसांतच ऊस तोडणीला येणार असल्याने हाच ऊस त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेचा मुख्य आधार होता. मात्र, एका क्षणात संपूर्ण पीक जळून खाक झाल्याने गुजर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.