Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: कृषी महोत्सवाला शेतकरी आणि ग्राहकांचा उदंड प्रतिसाद! 5 दिवसात झाली साडेतीन कोटींची उलाढाल

अहिल्यानगर शहरात आयोजित 'कृषीपर्व' या कृषी महोत्सवाला शेतकरी आणि ग्राहकांचा उदंड प्रतिसाद दिला. या कृषी महोत्सवामधून ३.४२ कोटी रुपये इतकी उलाढाल झाली असून, ग्राहक आणि शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळाला.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 10, 2026 | 07:35 PM
कृषी महोत्सवाला शेतकरी आणि ग्राहकांचा उदंड प्रतिसाद!

कृषी महोत्सवाला शेतकरी आणि ग्राहकांचा उदंड प्रतिसाद!

Follow Us
Close
Follow Us:
  • अहिल्यानगर शहरात ‘कृषीपर्व’ या कृषी महोत्सवाचे आयोजन
  • महोत्सवामधून ३.४२ कोटी रुपये इतकी उलाढाल
  • शेतकरी आणि ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण
अहिल्यानगर शहरात कृषी विभाग, आत्मा, पशुसंवर्धन विभाग (जिल्हा परिषद) आणि एक्स्पो इंडिया ओशियन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने नगर–पुणे रोडवरील नेमाणे इस्टेट येथे आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय ‘कृषीपर्व’ कृषी महोत्सवाचा समारोप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या उपस्थितीत पार पडला. या महोत्सवातून तब्बल 3.42 कोटी रुपये इतकी उलाढाल झाली असून, याचा मोठा लाभ शेतकरी आणि ग्राहकांना झाला आहे.

या कृषी महोत्सवाचे उद्घाटन 5 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते. महोत्सवाच्या कालावधीत विविध मान्यवरांनी भेट देत प्रदर्शनाची पाहणी केली व शासनाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. शासनाच्या पुढाकारातून सुरू झालेला हा उपक्रम आज वटवृक्षासारखा विस्तारला असून, भविष्यात त्याची व्याप्ती आणखी वाढेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

मोठी बातमी! Purandar Airport ला राज्य शासनाची मान्यता; 1 जून 2026 पर्यंत…, काय आहेत निर्देश?

या महोत्सवात शेतकरी ते थेट ग्राहक अशी विक्री व्यवस्था राबविण्यात आल्याने दोन्ही घटकांना मोठ्या प्रमाणावर लाभ झाला. ग्राहकांना दर्जेदार, ताजा आणि खात्रीशीर शेतमाल उपलब्ध झाला, तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी थेट बाजारपेठ मिळाल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

स्टॉलधारकांना प्रमाणपत्रांचे वितरण

समारोपप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी महोत्सवास भेट देऊन विविध स्टॉलधारकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या हस्ते स्टॉलधारकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शेतकरी व स्टॉलधारकांनी शासनाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत, शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. अशा प्रकारचे महोत्सव शासनामार्फत नियमितपणे आयोजित करण्यात यावेत, जेणेकरून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

4 लाखांहून अधिक नागरिकांची उपस्थिती

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले की, या कृषी महोत्सवास 4 लाखांहून अधिक ग्राहक व नागरिकांनी भेट देत खरेदीचा आनंद घेतला. यासोबतच विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनीही महोत्सवास भेट देऊन प्रदर्शनाची पाहणी केली. भविष्यात अशाच उपक्रमांच्या माध्यमातून शेतकरी आणि ग्राहकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध राहील, असेही त्यांनी नमूद केले.

“… कार्यवाही पूर्ण करावी”: Purandar Airport बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

महोत्सवाच्या यशासाठी सहकार्य

‘कृषीपर्व’ महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प संचालक (आत्मा) प्रदीप लाटे, उपसंचालक राजाराम गायकवाड, कृषी उपसंचालक सागर गायकवाड, उपकृषी अधिकारी (अहिल्यानगर) दत्तात्रय डमाळे, तसेच किरण मोरे, सागर ढवळे, प्रमोद गावडे, अशोक वाळके, हर्षदा जगताप, मनीषा कवटे, क्रांती चौधरी, प्रकाश आहेर यांच्यासह कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Web Title: More than 3 crore rupees collected in krushiparva organization of agricultural festival in ahilyanagar city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Farmers

संबंधित बातम्या

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन
1

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar News: संगमनेरमध्ये अवैध्य धंद्यावर धडक कारवाई, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Ahilyanagar News: संगमनेरमध्ये अवैध्य धंद्यावर धडक कारवाई, 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

Ahilyanagar News: ‘दावोस’ द्वारे नगरमध्ये तब्बल 12 हजार कोटींची गुंतवणूक! 18 हजार रोजगारांची निर्मिती होणार
3

Ahilyanagar News: ‘दावोस’ द्वारे नगरमध्ये तब्बल 12 हजार कोटींची गुंतवणूक! 18 हजार रोजगारांची निर्मिती होणार

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित
4

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.