Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उमरखेडच्या ब्राम्हणगावातील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती

ग्रामीण भागातील शेतीविजकडे यांचे विशेष दुर्लक्ष आहे. या संदर्भात पावसाळ्यापूर्वी महावितरणला कळवून देखील किरकोळ दुरूस्ती केल्यामुळे हे संकट शेतकऱ्यावर आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 22, 2024 | 09:01 AM
उमरखेडच्या ब्राम्हणगावातील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

उमरखेड : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे ब्राम्हणगाव येथील शेतकऱ्यांचा ऊस शॉर्टसर्किटमुळे आगीत जळून खाक झाला. अगोदरच प्रचंड अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. मंगळवारी (दि. 19) दुपारी अचानक हवेचा वेग वाढला व शेतातून गेलेला विजेचा तारांचे एकमेकांना घर्षण झाले. यात पार्किंग होऊन तोडणीला आलेल्या ऊसाने पेट घेतला. यामध्ये दीड एकर ऊस जळून खाक झाला.

हेदेखील वाचा : गोंदियात झाले 69.74 टक्के मतदान; तरीही तब्बल 3 लाख 40 हजार मतदारांची मतदानाला दांडी

ब्राम्हणगाव येथील शेतकरी कोंडबा संभाजी म्हैसकर यांच्या सर्वे नंबर 110 पैकी 1 या क्षेत्रातील एक एकर ऊस व त्यांचे बंधू रामचंद्र संभाजी म्हैसकर यांचा सर्वे नंबर 110 या क्षेत्रातील 20 आर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी गेला. ऑक्टोबर महिन्यात लागवड केलेला ऊस तोडणीच्या तोंडावर जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

बुधवारी (दि. 20) महावितरण कंपनीने शेतीचा पंचनामा करून नॅचरल शुगर गुंज या कारखानाकडे पाठवला असून, शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष ब्राम्हणगाव शिवारातील म्हैसकर यांचे शेत हे कालव्याला लागून आहे. येथील महावितरणची यंत्रणा ही जीर्ण झालेली असून, दरवर्षी दुरूस्ती ठेकेदाराच्या नावाने मोठ्या प्रमाणात भष्टाचार करणारे अधिकारी व लाईनमन शेतकऱ्यांच्या तक्रारीची कधीच दाखल घेत नाहीत.

ग्रामीण भागातील शेतीविजकडे यांचे विशेष दुर्लक्ष आहे. या संदर्भात पावसाळ्यापूर्वी महावितरणला कळवून देखील किरकोळ दुरूस्ती केल्यामुळे हे संकट शेतकऱ्यावर आले. यामुळे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान त्यांच्याकडून वसुल करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

कारखाना आता नोंद असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस किती दिवसात तोडून नेते याकडे आपदग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. ऑक्टोबर महिन्यातील लागवड असल्यामुळे ऊस वजनदार भरतो व उतारा देखील जास्त येतो. ऊस जळाल्यामुळे त्याच्या वजनात घट होते. तसेच कारखाना देखील त्यामध्ये कपात करतो. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

हेदेखील वाचा : एक्झिट पोल हे एक्झॅक्ट पोल नसतात; महाविकास आघाडी इतक्या जागा जिंकणार, विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा

Web Title: Sugarcane farmers in brahmangaon umarkhed burnt farm nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2024 | 09:01 AM

Topics:  

  • nanded news
  • Sugarcane Farmers

संबंधित बातम्या

पत्नीकडे वाईट नजरेने पाहिल्याचा राग अनावर; बाईकवर बसवलं, बियर पाजली अन्…
1

पत्नीकडे वाईट नजरेने पाहिल्याचा राग अनावर; बाईकवर बसवलं, बियर पाजली अन्…

Nanded News: पत्नीच्या छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, ११२ वर अर्धा तास पोलिसांशी बोलला आणि…
2

Nanded News: पत्नीच्या छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाने संपवलं जीवन, ११२ वर अर्धा तास पोलिसांशी बोलला आणि…

Nanded News: नांदेडमध्ये भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू; उभ्या असलेल्या ट्रकला कारने दिली धडक
3

Nanded News: नांदेडमध्ये भीषण अपघात, ३ जणांचा जागीच मृत्यू; उभ्या असलेल्या ट्रकला कारने दिली धडक

राज्यातील ‘हे’ विमानतळ अखेर करावे लागले बंद; प्रवाशांना मोठा फटका बसणार
4

राज्यातील ‘हे’ विमानतळ अखेर करावे लागले बंद; प्रवाशांना मोठा फटका बसणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.