स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आता 'हा' पक्ष करणार एंट्री; सांगलीच्या जतमध्ये... (Photo Credit- Social Media)
गोंदिया : जिल्ह्यातील चारही मतदारसंघांसाठी बुधवारी (दि. 20) उशिरापर्यंत मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात एकूण 11 लाख 25 हजार 100 मतदारांची नोंद असताना फक्त 7 लाख 84 हजार 606 मतदारांनीच मतदानाचा अधिकार बजावला. तब्बल 3 लाख 40 हजार 494 मतदारांनी मतदानाला पाठ दाखविली. यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्यामुळे याचा तोटा कुणाला होणार? हे मतमोजणीच्या दिवशी समोर येणार आहे.
हेदेखील वाचा : एक्झिट पोल हे एक्झॅक्ट पोल नसतात; महाविकास आघाडी इतक्या जागा जिंकणार, विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
गोंदिया जिल्ह्यातील मतदानाचा हक्क वाढावा यासाठी व्यापक जनजागृती केल्यावरही एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदानाला पाठ दाखविल्याने निवडणूक विभागासाठीही हा चिंतेचा विषय झाला आहे. आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर तातडीने जिल्हा निवडणूक विभागाने सर्वप्रथम मतदान जनजागृती कार्यक्रम हाती घेतला. त्यांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. पथनाट्य, रांगोळीतून जागृती, पत्रके वाटप असे मतदान केलेल्या मतदारांची आकडेमोड निकालावरून चिंता सतावू लागली आहे.
तृतीयपंथीयांचीही हुलकावणी
पुरुष आणि महिला उमेदवारांप्रमाणे तृतीयपंथी हा घटकदेखील समाजासाठी महत्त्वाचा आहे. त्यांनाही मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. गोंदिया मतदारसंघात 9, तर आमगाव मतदारसंघात एका तृतीयपंथी मतदाराचे मत आहे. मात्र, त्यापैकी गोंदियातील फक्त एकाच तृतीयपंथी मतदाराने मतदानाचा अधिकार बजावला. उर्वरित 9 मतदारांनी मतदान केले नाही.
मतदान वाढीसाठी घेण्यात आले अनेक कार्यक्रम
मतदान वाढीसाठी अनेक कार्यक्रम घेण्यात आले होते. त्यासाठी स्वीप अभियानही राबविण्यात आले होते. त्यामुळे या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढेल, अशी अपेक्षा होती. मात्र, मतदानाच्या शेवटी हाती आलेल्या आकडेवारीवरून निवडणूक विभागाचा संभ्रम दूर झाला. यंदाची विधानसभा निवडणूक चारही मतदारसंघांत अत्यंत चुरशीची झाली. त्यावरून उमेदवार जास्तीत जास्त मतदारांना घरातून मतदान केंद्रावर नेत मतदान करून घेतील, असे वाटत होते. मात्र, ती अपेक्षादेखील व्यर्थ ठरली.
आमगावच्या मतदारांमध्ये दिसून आला उत्साह
आमगावसारख्या जंगलव्याप्त आणि आदिवासीबहुल मतदारसंघातील मतदारांनी सर्वाधिक मतदान केले तर सर्वात कमी मतदान तिरोडा विधानसभा मतदारसंघात झाले. त्यावरून आता उमेदवारांनादेखील शनिवारी (दि. 23) हाती येणाऱ्या आता मतमोजणीकडे लागले सर्वांचे लक्ष लागले आहे.
उमेदवारांसह कार्यकर्ते आकडेमोड करण्यात व्यस्त
निवडणुकीत महत्त्वाचे असलेले प्रचार, मतदान असे दोन टप्पे पार पडले. प्रत्येक उमेदवार, पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते आता आकडेमोड करण्यात व्यस्त आहेत. अशात येत्या दोन दिवसांनंतर म्हणजेच शनिवारी मतमोजणी होणार आहे. आधीच मतदान कमी, त्यातही ‘नोटा’चे बटण दाबणाऱ्या मतदारांचाही समावेश असणार आहे. त्यामुळे नेमके आपल्या उमेदवाराला किती मते पडतील? याचा विचार करणे सुरू झाले असून, आता मतमोजणीकडे लक्ष लागले आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Exit Poll: शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का? महाराष्ट्रातील सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात