राज्यात महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राजकीय पक्षांकडून अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत. त्यातच कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महाविकास आघाडीच्या किती जागा निवडून येतील आणि मुख्यमंत्री कोण असेल यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच महाविकास आघाडीची सत्ता आली आणि कॉंग्रेसला बहुमत मिळालं तर नाना पटोले मुख्यमंत्री होऊ शकतात का? यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
विधानसभा निवडणुकीचा निकाल महाविाकास आघाडीच्य बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडी १६५ ते १७० जागा जिंकेल. महायुती सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रोश होता. त्यामुळे लोकांना बदल हवा आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी तोडफोड करून सरकार स्थापन केलं होतं. एक्झिट पोल हे एक्झॅक्ट पोल नसतात. २३ तारखेपर्यंत सर्वांनी निकालाची वाट पाहावी. निकालात काय ते स्पष्ट होईल. महाविकास आघाडी महाराष्ट्रात १६५ जागा जिंकत असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.
नाना पटोले मुख्यमंत्री होणार का?
मुख्यमंत्रिपदाबाबत नाना पटोले यांनी ते मुख्यमंत्री होणार असं कुठेही म्हटलेलं नाही. महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्री कोणाला बनवायचं? याबाबत निर्णय घेऊ. माध्यमांनी प्रश्न विचारल्यामुळे संजय राऊत यांच्या तोंडून तसा शब्द निघाला असेल. मात्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना मुख्यमंत्री व्हायच आहे असं कधीच म्हटलेलं नाही, अस विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.