Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sugarcane Workers : ऊसतोड कामगारांसाठी संजय राठोडांची मोठी घोषणा! मुलांच्या शिक्षणापासून आरोग्य सुविधांपर्यंत सरकारचा मोठा प्लॅन

Sugarcane Workers : राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी मंत्री संजय राठोड यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. महामंडळाकडे नोंदणी नसलेल्या कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी विशेष नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 07, 2026 | 10:17 PM
sanjay rathod sugarcane workers

sanjay rathod sugarcane workers

Follow Us
Follow Us:
  • ऊसतोड कामगारांसाठी राज्यात विशेष नोंदणी मोहीम
  • संजय राठोडांची मोठी घोषणा
  • ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठी योजना
 

अहिल्यानगर : राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महामंडळाकडे नोंदणी नसल्यामुळे अनेक कामगार सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहत असल्याचं समोर आलं आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्यात ऊसतोड कामगारांसाठी विशेष नोंदणी मोहीम राबवण्याबाबत शासन स्तरावर पुढाकार घेणार असल्याची घोषणा जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केली आहे. (Sugarcane Workers)

मंत्री संजय राठोड यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, कोळपेवाडी आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, संजीवनीनगर येथे भेट दिली.

यावेळी त्यांनी थेट ऊसाच्या फडात जाऊन ऊसतोडणीच्या कामाचा अनुभव घेतला. कामगारांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. दिवाळीनिमित्त कामगारांना शिधा किटचेही वाटप करण्यात आले.

Buldhana News: दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा द्या; पालकमंत्री मकरंद जाधव पाटलांचे प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश

नोंदणी नसलेल्या कामगारांसाठी विशेष मोहीम

या भेटीदरम्यान अनेक ऊसतोड कामगारांची संबंधित महामंडळाकडे नोंदणीच झालेली नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे पात्र असूनही अनेकांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही.

यावर महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित महामंडळाच्या माध्यमातून राज्यभर विशेष नोंदणी मोहीम राबवण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं राठोड यांनी स्पष्ट केलं.

मुलांच्या शिक्षणासह आरोग्य आणि सुरक्षेवर भर

ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शाळा आणि वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असेल. वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास पात्रतेनुसार आर्थिक मदत देण्याचाही विचार आहे.

याशिवाय ऊसतोडणीच्या ठिकाणी आरोग्य शिबिरं आयोजित केली जाणार आहेत. कामगारांना आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यावरही भर दिला जाणार आहे.

रात्रीच्या ऊसतोडणीवेळी बिबट्या, सापांचा धोका

कामगारांनी मंत्र्यांसमोर आपल्या अडचणी मांडताना रात्रीच्या ऊसतोडणीदरम्यान पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसल्याचं सांगितलं. अनेकदा बॅटरी किंवा लाईटशिवाय काम करावं लागतं. त्यामुळे बिबट्या, साप आणि इतर वन्यजीवांचा धोका निर्माण होतो. सुरक्षा किटचाही अभाव असल्याचं कामगारांनी सांगितलं. या सर्व प्रश्नांवर मंत्रिमंडळात चर्चा करून ठोस उपाययोजना करण्याचं आश्वासन राठोड यांनी दिलं.

दरम्यान, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण आणि पाणी अडविणे-मुरविणे या जलसंधारणाच्या कामांनाही गती देण्यात येणार आहे.

Washim News: २४७ गावांना पाणीटंचाईचा धोका; दुष्काळमुक्तीसाठी ‘सीएसआर’चे बळ, जलसंधारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कंपन्यांना आवाहन

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऊसतोड कामगारांसाठी कोणती विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे?

    Ans: राज्यातील ऊसतोड कामगारांची संबंधित महामंडळाकडे नोंदणी करण्यासाठी महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित महामंडळाच्या माध्यमातून विशेष नोंदणी मोहीम राबवण्याचा शासन स्तरावर प्रयत्न केला जाणार आहे.

  • Que: ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सरकार काय करणार आहे?

    Ans: मुलांच्या शिक्षणासाठी शाळा आणि वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यास पात्रतेनुसार आर्थिक मदत देण्याची तरतूद करण्याबाबतही प्रयत्न केले जाणार आहेत.

  • Que: ऊसतोड कामगारांना आरोग्य आणि सुरक्षा सुविधा मिळणार का?

    Ans: होय. ऊसतोडणीच्या ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करणे, आवश्यक सुरक्षा साहित्य उपलब्ध करणे आणि रात्रीच्या कामातील धोके कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यावर सरकारचा भर आहे.

Web Title: Sugarcane workers maharashtra sugarcane workers special registration campaign sanjay rathod vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 10:14 PM

Topics:  

  • sanjay rathod
  • Sugarcane
  • sugarcane workers

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: दुष्काळात पशुधनासाठी चाऱ्याची चिंता मिटणार? सरकारचा महत्त्वाचा निर्णय, शेतकऱ्यांना आता…
1

Maharashtra Drought: दुष्काळात पशुधनासाठी चाऱ्याची चिंता मिटणार? सरकारचा महत्त्वाचा निर्णय, शेतकऱ्यांना आता…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.