यवत : राज्यभर महिला दिन साजरा होत असताना आणि महिलांचा गौरव होत असताना याच दिवशी यवत पोलीस ठाणे हद्दीत दोन महिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. पूनम बाळासाहेब टेकवडे ( वय २२, रा. कासुर्डी), यमुना हनुमंत कारंडे (वय ५२, रा. पारगाव), अशी आत्महत्या केलेल्या महिलांची नावे आहेत.
कासुर्डी (ता. दौंड) येथील पूनम टेकवडे या तरुणीने राहते घरी पत्र्याच्या अँगलला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची खबर बजाबा बजाबा खेंनट यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.
पारगाव येथे यमुना हनुमंत कारंडे (वय ५२, रा. पारगाव) या महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. यमुना कारंडे या रयत शिक्षण संस्थेच्या पाट्स आणि पारगाव शाळेत क्लार्क म्हनून काम करीत होत्या, तर त्यांचे पती हनुमान कारंडे हे पुणे जिल्हा बॅंकेत नोकरी करीत आहेत. त्यांची मुले उच्च शिक्षण घेत आहेत, सुशिक्षत कुटुंबातील महिलेने आत्महत्या केल्याने पारगाव येथे खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.