Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court On NCP : ‘येत्या ३६ तासांच्या आत पक्ष आणि चिन्ह…..’; ऐन निवडणुकीत सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश

ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाने पुढील ३६ तासाच्या आत राज्यातील मराठी वर्तमानपत्रात मोठ्या जाहिराती देऊन हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं नमूद करण्याचे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Nov 06, 2024 | 06:35 PM
ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला निर्देश दिले आहेत.

ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला निर्देश दिले आहेत.

Follow Us
Close
Follow Us:

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतचा विषय न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाने पुढील ३६ तासाच्या आत राज्यातील मराठी वर्तमानपत्रात मोठ्या जाहिराती देऊन हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं नमूद करण्याचे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत. तसंच या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत घड्याळ चिन्ह आम्हाला दिलंय, असंही नमूद करण्याचे निर्देश न्यायालयाने म्हटलं आहे.

हेही वाचा-Rahul Gandhi : जातीनुसार जनगणना का महत्त्वाची? ऐका राहुल गांधीचं संविधान सन्मान संमेलनातील दमदार भाषण

अजित पवार गटात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबतचा खटला सध्या सुप्रीम कोर्टात सुरू आहे. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक सुरू आहे. निवडणूक प्रचारातील जाहिराती आणि बॅनरमध्ये अनेक ठिकाणी डिस्क्लेमर दिला नसल्याचा दावा शरद पवार यांचे वकील प्रांजल अगरवाल यांनी कोर्टात केला होता. डिस्क्लेमर दिलेले नसल्याचे स्क्रीनशॉट देखील दाखवण्यात आले आहेत. यानंतर जाहिरात आणि बॅनरमध्ये प्रत्येक दिवशी येणाऱ्या जाहिरातीमध्ये हा डिस्क्लेमर देत आहात का ? असा सवाल न्यायालयाने अजित पवार गटाला केला. अजित पवार गटानेही आपण न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत असल्याचं सांगितलं.

कोर्ट काय म्हणालं?

न्यायालयाने शरद पवार गटाची बाजू ऐकून घेतल्यानंतर अजित पवार गटाला, पुढील ३६ तासाच्या आत राज्यातील सर्व मोठ्या मराठी वर्तमानपत्रात मोठ्या जाहिराती देऊन, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असा मजकूर त्या जाहिरातीत नमूद करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत घड्याळ चिन्ह वापरण्याचे अधिकार तुम्हाला दिले आहेत, असंही नमूद करून तसं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा-Rahul Gandhi : देशाच्या संविधानाला आणि एकात्मतेला अदृश्य शक्तींचा धोका; संविधान सन्मास संमेलनात राहुल गांधी यांचा ह्ल्लाबोल

यावेळी शरद पवार गटाच्या वकिलांनी नागालँड आमदार अपत्रता प्रकरणी देखील सोबत सुनावणी घेण्याची मागणी केली. यावर अजित पवार गटाने आक्षेप घेत शरद पवार गटाकडून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न जात असल्याचं सांगितलं. पुढच्या १० दिवसांवर निवडणूक आली आहे. आमच्या उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर अर्ज दाखल केले आहेत, तसा प्रचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

पक्ष, चिन्हही पळवलं : शरद पवार

गेल्या आठवण्यात शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आणि तोच पक्ष माझ्याकडून हिसकावून घेतला नेला, अशी खंत पवारांनी बारामतीत बोलून दाखवली होती. कधीही कोर्टाची पायरी चढली नव्हती पण न्यायालयात जाण्याची आणली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष काढला, मात्र एके दिवशी काही लोकांनी हा पक्ष आता त्यांचा आहे, असं सांगितलं. हे दुसरे कोणी नव्हते, ते आमचेच लोक होते. मला समन्स बजावला,पक्ष पळवला, चिन्ह पळवल्याचा आरोप शरद पवारांनी या सभेत केला. चार वेळा बारामतीचा उपमुख्यमंत्री बनवला. मी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले, तरीही लोकांची साथ सोडली नव्हती, असंही त्यांनी म्हटलं होतं.

 

Web Title: Supreme court order to ncp ajit pawar group give large advertisement in marathi newspapers party and symbol case is subjudice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 05:54 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Mumbai News  :   गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?
1

Mumbai News : गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन
2

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन

Thackeray-Shinde Conflicts: धनुष्यबाणाची लढाई आणखी लांबली; शिदेंना दिलासा, ठाकरेंची निराशा
3

Thackeray-Shinde Conflicts: धनुष्यबाणाची लढाई आणखी लांबली; शिदेंना दिलासा, ठाकरेंची निराशा

Bihar Election: ‘SIR’ प्रक्रियेवरून विरोधकांना मोठा धक्का; सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय
4

Bihar Election: ‘SIR’ प्रक्रियेवरून विरोधकांना मोठा धक्का; सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.