कोर्टाने आदेश दिल्यानुसार, पुढील चार आठवड्यांत निवडणुकांची अधिसूचना जारी करून चार महिन्यांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. या प्रक्रियेत 2022 पूर्वी ओबीसी आरक्षणासंदर्भात जी स्थिती होती, तीच कायम ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वी जितक्या जागांवर ओबीसी आरक्षण लागू होते, तितक्याच जागांवर आता देखील राहील. काही ठिकाणी निवडणुका घेणे अशक्य असल्यास, निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करून अधिक वेळ घेता येऊ शकतो, असे वकिलांनी स्पष्ट केले आहे.