Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : कोकण ते कोल्हापूर प्रवास आता होणार सोपा; रोजगार हमी योजनेतून विकासकामाला गती

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा पन्हाळा तालुक्यातील आणखी एक लगतचा घाटमार्ग ठरणाऱ्या काजिर्डा घाट मार्गाचे सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात असून त्यानंतर त्याचा डीपीआर शासनाला सादर केला जाणार आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 09, 2026 | 02:52 PM
Kolhapur News : कोकण ते कोल्हापूर प्रवास आता होणार सोपा; रोजगार हमी योजनेतून विकासकामाला गती
Follow Us
Close
Follow Us:
  • कोकण ते कोल्हापूर प्रवास आता होणार सोपा;
  • रोजगार हमी योजनेतून विकासकामाला गती
पन्हाळा/ नितीन भगवान : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा पन्हाळा तालुक्यातील आणखी एक लगतचा घाटमार्ग ठरणाऱ्या काजिर्डा घाट मार्गाचे सर्व्हेक्षण अंतिम टप्प्यात असून त्यानंतर त्याचा डीपीआर शासनाला सादर केला जाणार आहे. या नवीन घाट मार्गामुळे प्रवासाचे अंतर आणि लागणारा वेळ कमी होणार असून समस्त प्रवाशांसाठी नवीन घाट मार्ग फायदेशीर ठरणार आहे.यापूर्वी (जुलै २०२१) मध्ये झालेल्या तीव्र अतिवृष्टीत काही घाटांत दरडी कोसळुन कोल्हापूरसह पश्चीम महाराष्ट्राशी दळणवळणाचा संपर्क काही काळ बंद पडला होता. त्या पार्श्वभूमीवर कोकण-कोल्हापूरसाठी एखादा भक्कम, सुरक्षित आणि तेवढाच महत्वपूर्ण घाट असणे किती गरजेचे आहे ते अधोरेखित झाले होते.यानंतर अडगळीत जावून पडलेल्या काजिडां घाट रस्त्याचा मुद्दा अग्रस्थानी आला होता. रत्नागिरी कोकण आणि कोल्हापूर यांना यापुर्वी सत्तरीच्या दशकात रोजगार हमी योजनेतुन काजिर्डा कोल्हापूर जोडणाऱ्या घाटाच्या खोदकामाचे कामा हाती घेण्यात आले होते. त्या दरम्यान त्या घाटाचे काम फक्त एक टप्प्याचे राहिले होते. मात्र त्याच दरम्यान पाचल परिसरातील काही पुढारी यांनी तत्कालीन मंत्री भाई हातणकर, रेल्वे मंत्री मधू दंडवते यांना सांगून तो निधी अणुस्कुरा घाटाला फिरवण्यात आला आणि त्या कामाला आरंभ झाला.

सुमारे ८ ते ९ कि.मी. घाट मार्गाचे सर्व्हेक्षण
चार वर्षांपूर्वी नियोजित घाट मार्गाच्या सर्व्हेक्षणासाठी शासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसार मागील काही दिवसांत घाट मार्गाचे सर्व्हेक्षण सुरु असून ते काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाचे सर्व्हेक्षण अल्मोटस या नाशिक स्थित कंपनीकडे देण्यात आले असून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ८ ते ९ कि.मी. घाट मार्गाचे सर्व्हेक्षणाचे काम आहे.

Kolhapur News : जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न; पहिल्याच जनता दरबारात नागरिकांचा प्रतिसाद

अधुन मधुन काजिर्डा मार्गे घाट रस्त्याचा मुद्दा चर्चेत
काजि मार्गे घाट रस्त्याचे काम आपोआप मागे पडले ते कायमचेच. नंतर अणुस्कुरासह गगनबावडा घाटाना महत्व प्राप्त झाल्याने काजिर्डा घाट मार्ग विजनवासात गेला होता. कालांतराने काजिर्डा गावात मोठा ल.पा. प्रकल्प मंजुर झाला. आणि त्याचे काम देखील सुरु झाले होते. तथापी अनेक मुद्द्यांवरून स्थानिक जनतेतून संघषांची भुमिका राहिल्याने तो प्रकल्प देखील रखडला आहे. अद्यापही त्याचे काम सुरु झालेले नाही, तरीही अधुन मधुन काजिर्डा मार्गे घाट रस्त्याचा मुद्दा चर्चेत असायचाच.

घाटाच्या बाजूलाच बारमाही वाहणारा धबधवा असून पावसाळ्यात तसेच त्यानंतर देखील पर्यटक काजिर्डा गावी भेट देतात. घाट मार्ग सुरु झाल्यावर पर्यटकांना त्या धबधब्याकडे जाण्यासाठी चांगली संधी मिळणार आहे. त्या1 धबधब्याला आता मात्र नवनिर्वाचित आ. किरण सामंत यांनी रस्ते व पर्यटनांसाठी लोकेशन 5 करण्यासाठी ५ कोटीचा निधी दिला आहे. तेथील धबधब्या बरोबर काजिर्डा गावी शिवकालीन, 1 पांडव कालीन अन्य ठिकाणे आहेत, ऐतिहासिकमुडा गड, पांडव कालीन खोदकाम केलेला मोठा पाण्याचा तलाव, घाट माथ्यावरील ऊगवाई मंदिर, म्हातारी घोड नांवाची उंच टेकडी, पोकर धोंड नांवाची खोल दरी, वाचबिळ जवळील गुहा, अशी अनेक तेवील बघण्या सारखी ठिकाणे आहेत.

प्रवाशांचा वेळ वाचण्यास मदत होणार
हे काम अंतिम टप्प्यात असून त्यानंतर त्याचा डीपीआर शासनाकडे सादर केला जाईल, हा घाट मार्ग गावाबाहेरून काढला जाणार आहे. कारण काजिर्डा गावामध्ये होवू घातलेल्या जामदा प्रकल्पामुळे घाट मार्ग बाहेरून घ्यावा लागणार आहे. काजिर्डा घाट मार्गामुळे राजापूर तालुका आणि कोल्हापूर जिल्हा यामधील अंतर आणि वेळ कमी होणार असून प्रवाशांना त्याचा चांगलाच फायदा होणार आहे.

Kolhapur News : पंचगंगेचा वनवास संपणार कधी ? प्रदुषित पाण्यामुळे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ

Web Title: Survey of kazirda ghat route west of panhala in final stagetravel from konkan to kolhapur will now be easier

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • kokan
  • Kolhapur District
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Jalna:  लक्ष्मण हाकेंच्या बारामती आंदोलनाला नवनाथ वाघमारेंचा पाठिंबा
1

Jalna: लक्ष्मण हाकेंच्या बारामती आंदोलनाला नवनाथ वाघमारेंचा पाठिंबा

Vasai Virar :  वसई विरार महापालिकेच्या अर्थसंकल्पातून पर्यटन विकासाला चालना
2

Vasai Virar : वसई विरार महापालिकेच्या अर्थसंकल्पातून पर्यटन विकासाला चालना

Latur News : अधिकारी फोन उचलत नाहीत! लातूरमध्ये सोयी-सुविधांसाठी ग्रामस्थांचा संताप
3

Latur News : अधिकारी फोन उचलत नाहीत! लातूरमध्ये सोयी-सुविधांसाठी ग्रामस्थांचा संताप

Kalyan : कचऱ्याच्या वादातून सफाई कर्मचाऱ्याची हत्या  
4

Kalyan : कचऱ्याच्या वादातून सफाई कर्मचाऱ्याची हत्या  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.