Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sushma Andhare : ”कधीकाळी या बाई उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या”; वाघबाई म्हणत अंधारेंनी सगळंच काढलं

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील महिला नेत्यांवर आणि चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कधीकाळी या बाई उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Mar 21, 2025 | 03:35 PM
''कधीकाळी या बाई उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या''; वाघबाई म्हणत अंधारेंनी सगळंच काढलं

''कधीकाळी या बाई उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या''; वाघबाई म्हणत अंधारेंनी सगळंच काढलं

Follow Us
Close
Follow Us:

दिशा सालियान प्रकरणाला पुन्हा एकदा राजकीय रंग चढला असून आदित्य ठाकरेंचे संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. दिशा सालियनचे वडrल सतिश सालियन यांनी दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशी करावी, यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.विधिमंडळ सभागृहात देखील याचे पडसाद उमटले. त्यावरुन, सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून शिवसेना शिंदे गटातील काही आमदारांनीही आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी केली आहे.

भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यासह शिवसेनेतील महिला नेत्यांनीही ठाकरेंना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनीही सभागृहात याप्रकरणी भूमिका घेतली होती. आता, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील महिला नेत्यांवर आणि चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कधीकाळी या बाई उद्धव ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी लोळत आल्या होत्या, अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी निशाणा साधला आहे.

वाघ बाईंनी काल जी भाषा वापरली त्यावर मी जाणार नाही, वाघबाई आणि किरीट सोमय्या यांचा भाजप कसा वापर करून घेत आहे ते दिसतय. वाघ बाईंनी कमी आकडा सांगितला तो कमी आहे, असेही सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा एकदा म्हटलं. महाराष्ट्राची परंपरा फुले, शाहू आणि आंबेडकरांची आहे, राज्याच्या सभागृहाला मोठी परंपरा आहे. कालचा थयथयाट सभागृहाची गरिमा खाली आणणारा होता, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला.

नागपूर दंगलीतील आरोपी भाजपशी संबंधित आहे, त्याबाबत आपण लवकर पुरावे दाखवणार आहोत. नागपूर दंगल अंगाशी आली आहे, म्हणून भाजपने दिशा सालियन प्रकरण बाहेर काढले आहे. एखाद्याच्या दुःखाला आपलं राजकारण करण्याचं नीच काम भाजपकडून होत आहे. एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या, अनेकजण म्हणाले की झोपडपट्टीतील भाषा वापरली जात होते. पण, झोपडपट्टीला देखील एक क्लास असतो, झोपडपट्टीतील लोकं आपलं इमान विकत नाहीत. सभागृहात आणखी एक बाई होत्या, ज्यांना आम्हीच सदस्यत्व दिलं. पण, जिकडे खावा तिकडे थवा असं काम आहे. या बायकांच्या आडून भाजप तिर मारत आहेत, म्हणून मी इथे उत्तर देत आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

कधीकाळी या बाई पक्ष प्रवेशासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे लोळत आल्या होत्या. संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली असं यांचं म्हणणं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री कसे?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना विचारला.

वाघ बाई भटक्या समाजातील लोकांचे करिअर उद्धवस्त करत आहेत, पूजा चव्हाण यांची केस पून्हा ओपन करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. आमच्या पक्षातील नेते रघुनाथ कुचिक यांचे प्रकरण चित्रा वाघ यांनी लावून धरलं होते. या प्रकरणातील पीडित तरुणीने जे खुलासे केले होते, शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी मला चित्रा वाघ यांनी सांगितले होते, असं पीडित तरुणीने सांगितलं होते. मेहबूब शेख प्रकरणात देखील पीडित तरुणीला चित्रा वाघ यांनी सांगितलं होतं, तुला एफआयआरप्रमाणेचं बोलाव लागेल, माझा चित्रा वाघ यांनी व्हिडीओ देखील काढला होता, असेही पीडित तरुणीने म्हटले होते, अशी माहितीही सुषमा अंधारे यांनी दिली.

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने झाले आहेत, मात्र त्याचा आरोपी अद्याप फरार आहे. 100 दिवसात ज्या लोकांचे घोटाळे बाहेर आले ते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातील आहेत. उद्धव ठाकरेंबाबत फेक नेरेटिव्ह तयार करण्याचे काम केले जातं आहे. दिशा सालियनप्रकरणात मनिषा कायंदे आधी काय बोलल्या होत्या हे सर्वांना माहिती आहे, औरंगजेबच्या कबरीचा मुद्या अंगाशी आल्यामुळे दिशा प्रकरण काढण्यात आल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली.

Web Title: Sushama andhere criticize chitra wagh who attack on uddhav thackeray in vidhan parishad on sanjay rathod case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 03:34 PM

Topics:  

  • chitra wagh
  • Maharashtra Politics
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Pune News: म्हाळुंगे येथे राष्ट्रवादीला उस्फूर्त प्रतिसाद; पदयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग
1

Pune News: म्हाळुंगे येथे राष्ट्रवादीला उस्फूर्त प्रतिसाद; पदयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग

Maharashtra Politics: कॉँग्रेसचा ‘हात’ मोडला? भाजपने केला गेम; थेट 12 नगसेवक फोडले अन्…
2

Maharashtra Politics: कॉँग्रेसचा ‘हात’ मोडला? भाजपने केला गेम; थेट 12 नगसेवक फोडले अन्…

Maharashtra Politics: निवडणूक लागताच पक्षांना बंडखोरीचा फटका; अमरावतीमध्ये तब्बल 19…
3

Maharashtra Politics: निवडणूक लागताच पक्षांना बंडखोरीचा फटका; अमरावतीमध्ये तब्बल 19…

पुण्यात भाजपला बसणार धक्का; माजी शहर उपाध्यक्ष अमराळे आज करणार राष्ट्रवादीत प्रवेश
4

पुण्यात भाजपला बसणार धक्का; माजी शहर उपाध्यक्ष अमराळे आज करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.