Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुशांतसिंह प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत

सुशांतसिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवर एयू या नावाने आलेले कॉल्स हे आदित्य उद्धव ठाकरे यांचे होते की, अनन्या उधास यांचे होते, असा प्रश्न शेवाळे यांनी लोकसभेत उपस्थित केला. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एयू म्हणजे आदित्य-उद्धव असल्याचे वक्तव्य राहुल शेवाळे यांनी केले. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी सुशांतसिंह प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करण्याचे संकेत दिले आहेत. 

  • By Ganesh Mate
Updated On: Dec 22, 2022 | 01:01 PM
सुशांतसिंह प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात (Winter Session) संकेत दिले. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबाबत जनतेच्या मनात संभ्रम होता आणि अजूनही आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात शिवसेना नेते आदित्य उद्धव ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर थेट आरोप केले नसले तरी त्यांच्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुशांतसिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवर एयू या नावाने आलेले कॉल्स हे आदित्य उद्धव ठाकरे यांचे होते की, अनन्या उधास यांचे होते, असा प्रश्न शेवाळे यांनी लोकसभेत उपस्थित केला. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एयू म्हणजे आदित्य-उद्धव असल्याचे वक्तव्य राहुल शेवाळे यांनी केले. त्यावरून मुख्यमंत्र्यांनी सुशांतसिंह प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करण्याचे संकेत दिले आहेत.

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. नितेश राणे यांनी देखील विधानसभेच्या बाहेर सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येऊ द्या. आजही दिशा सालियानची केस मुंबई पोलिसांकडे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सुशांत सिंह प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करा. ८ जूनला काय झाले? दोनवेळा तपास अधिकारी का बदलला? सीसीटीव्ही का गायब झाले? व्हीडीटर्स बुकचे त्या दोन दिवसांचे पान का फाडले गेले? हे प्रश्न अनुत्तरीत आहे.

संजय राऊत म्हणाले…
दरम्यान, सुशांतसिंग राजपूत प्रकरण तेव्हाच्या विरोधी पक्षाने हे प्रकरण उभे केले. मात्र, सीबीआयसह तपास यंत्रणांनी आत्महत्या असल्याचे म्हटले आहे. तसेच, ज्यांच्यावर बलात्कार, विनयभंगासारखे आरोप असणाऱ्यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केले, असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, संसदेत राहुल शेवाळे यांनी केलेल्या आरोपांवरून राऊत यांनी समाचार घेतला. आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोपांमुळे फुटीर लोक किती खाली गेले ते समोर आले. मात्र, हे सरकार भ्रष्टाचाराच्या ओझ्याने पडेल, असेही संजय राऊत यांनी भाकित केले.

Web Title: Sushant singh case file will be opened again signals of chief minister eknath shinde nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2022 | 01:01 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Cm Eknath Shinde
  • rahul shewale
  • sushant singh rajput
  • Winter Session

संबंधित बातम्या

Rhea Chakraborty:अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट कायमचा परत करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे एनसीबीला निर्देश
1

Rhea Chakraborty:अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट कायमचा परत करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे एनसीबीला निर्देश

सुशांतला आठवत, अंकिता लोखंडेने इंस्टाग्रामवर शेअर केला ‘तो’ खास व्हिडिओ
2

सुशांतला आठवत, अंकिता लोखंडेने इंस्टाग्रामवर शेअर केला ‘तो’ खास व्हिडिओ

मोठी बातमी ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे यांच्यात बंद दाराआड तब्बल तीन तास चर्चा
3

मोठी बातमी ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे यांच्यात बंद दाराआड तब्बल तीन तास चर्चा

Maharashtra Monsoon Session 2025:  वरूण सरदेसाई, आदित्य ठाकरे भिडले; शंभुराज देसाईं भडकले
4

Maharashtra Monsoon Session 2025: वरूण सरदेसाई, आदित्य ठाकरे भिडले; शंभुराज देसाईं भडकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.