Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुषमा अंधारेंचा नवनीत राणांवर घणाघात; म्हणाल्या, “सत्तेसाठी बाप बदलणारे”

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे

  • By प्रीति माने
Updated On: Mar 31, 2024 | 03:31 PM
सुषमा अंधारेंचा नवनीत राणांवर घणाघात; म्हणाल्या, “सत्तेसाठी बाप बदलणारे”
Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : लोकसभा निवडणूक जवळ आल्याने अनेक राजकीय हालचाली घडत आहे. अमरावतीमधील नेत्या नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. 2014 ला जी माऊली उभी राहिली तेव्हा म्हणाल्या पवार साहेब माझे वडील आहेत. आता अमित शाह यांच्यासाठी पितृतुल्य झाले आहेत. सत्तेसाठी बाप बदलणारे असतील तर याला काय म्हणावं? असा घणाघात सुषमा अंधारे यांनी केला आहे.

अमरावतीच्या सभेमध्ये सुषमा अंधारे यांनी आपल्या खास शैलीमध्ये नवनीत राणा यांच्यावर टीकास्त्र डागले. अंधारे म्हणाल्या, “नवनीत आक्कावर हल्ला करणारा आमचा शिवसैनिक पण मंचावर आहे. जर मला जात चोरता आली असती तर मला कदाचित अमरावती निवडणूक लढवता आली असती. एक दिन मे रश्मी बर्वेच जात प्रमाणपत्र रद्द होते आणि पाच वर्षांपासून नवनीत राणा यांचा निकाल का लागत नाही? निकाल काय लागणार हे माहीत आहे का?  गणेश विसर्जन कसं करतात हे तरी कळते का?”  असा सवालही सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी उपस्थित केला.

या संविधान लोकांना बदलायचं आहे

“उदयनराजे यांना चार दिवस वेटिंगवर ठेवले. एकाच रात्री नवनीत राणाची उमेदवारी दिली आणि लगेच एकाच दिवशी अमित शहा भेटतात. देवा भाऊ नवनीत राणाचं वजन तुमच्यापेक्षा जास्त होत आहे का? ही निवडणूक लोकांनी आपल्या हातात घेतली आहे. त्यांना सगळं माहीत आहे की काय घडलं. जितका मोठा घोटाळा तितक पद मोठं ही मोदींची गॅरंटी आहे. संविधान धोक्यात आलं आहे. या संविधान  लोकांना बदलायचं आहे. ज्या बाईने हनुमान चालीसा वर वादंग केलं त्यांना अजूनही हनुमान चालीसा म्हणता येत नाहीये,” असेही अंधारे यांनी नमूद केलं.

पाच वर्षांपूर्वी शाई लावली की चुना लावला

“भाजपच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं असेल. इथले भाजपचे लोक ही नवनीत राणाला मतदान करणार नाहीत. कापसाला भाव फक्त 11 हजार रुपये दर हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना शेतकऱ्यांना मिळाला. आज 6 हजार रुपये पेक्षा कमी मिळत आहे. ज्या ज्या लोकांच्या घरी धाडी टाकल्या त्याच्या पाच ते सहा दिवसात त्या लोकांनी पार्टी फंड दिलेला आहे. नवनीत राणाला मतदान करतांना तुम्ही शरद पवार यांच्याकडे पाहून दिले. आता असं वाटत आहे की, पाच वर्षांपूर्वी शाई लावली की चुना लावला. नवनीत राणा यांना मी खुल आवाहन करते की, अमरावतीच्या गरीब लेकरांना दत्तक घेऊन त्यांना फुकटात शिक्षण देऊन दाखवा. अमरावतीच्या उमेदवाराला निवडून द्या. तुम्ही भावनिक होऊ नका,” असे आवाहन ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले.

Web Title: Sushma andhare criticized navneet rana in amravati meeting maharashtra politics sharad pawar amit shah nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2024 | 03:30 PM

Topics:  

  • loksabha elections 2024
  • Navneet Rana
  • Poltical News
  • shivsena
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात
1

Balasaheb Thackeray: शिवाजी पार्कला विनायक राऊत यांनी सरण रचलं अन्…; बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत आणखी एक नेता उतरला मैदानात

Ramdas Kadam: बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरुन राजकारण; उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची आता सटकली
2

Ramdas Kadam: बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहावरुन राजकारण; उद्धव ठाकरेंच्या नेत्यांची आता सटकली

Shivsena News : दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला मदतीचा हात
3

Shivsena News : दसरा मेळाव्यापूर्वी शिवसैनिकांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिला मदतीचा हात

शिंदेच्याचं शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गुंड म्हणाला मी इकडचा भाई ! माझी परवानगी घेतली का ?
4

शिंदेच्याचं शाखा प्रमुखावर बंदूक रोखत गुंड म्हणाला मी इकडचा भाई ! माझी परवानगी घेतली का ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.