Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : अनिकेत तटकरेंनी केले DCM सुनेत्रा पवारांच्या गाडीचे सारथ्य; सुषमा अंधारेंनी साधला निशाणा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चिपळूणला आल्यावर शासकीय चालकाला खाली उतरवून सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी स्वतः गाडीचे स्टेअरिंग हाती घेतले. यावरुन राजकारण रंगले,

  • By प्रीति माने
Updated On: Feb 22, 2026 | 03:05 PM
Sushma Andhare target Aniket Tatkare for drive Sunetra Pawar car in chiplun

Sushma Andhare target Aniket Tatkare for drive Sunetra Pawar car in chiplun

Follow Us
Close
Follow Us:
  • DCM सुनेत्रा पवार यांची गाडी अनिकेत तटकरे चालवली
  • शासकीय ड्रायव्हरला खाली उतरवून घेतलं स्टेअरिंग हातात
  • उपनेत्या सुषमा अंधारे यांची टीका
Maharashtra Politics : चिपळूण : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या चिपळूणमध्ये आल्या होत्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उपस्थित होत्या. त्या खासगी हेलिकॉप्टरने सावर्डेपर्यंत आल्या आणि तेथून पुढे विवाहस्थळापर्यंत चारचाकी गाडीतून गेल्या. मात्र त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरवरुन आता रंगला आहे. शासकीय चालकाला खाली उतरवून सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी स्वतः गाडीचे स्टेअरिंग हाती घेतले. यामुळे आता वाद निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी टीका केली आहे.

अनिकेत तटकरे यांच्या ड्रायव्हिंगवर सुषमा अंधारे यांनी टीका केली. पुढे ते म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षेच्या संदर्भाने हलगर्जीपणा केला जात आहे. अनिकेत तटकरे यांनी प्रोटोकॉल तोडला आहे. सुनील तटकरे यांचे चिरंजीव म्हणून त्यांना विशेष प्राधान्य दिले जाते का? सुनेत्रा पवारांच्या सुरक्षेबाबत असा हलगर्जीपणा होत असेल तर याची चौकशी झाली पाहिजे. अनिकेत तटकरे यांची देखील चौकशी झाली पाहिजे. तटकरे यांना जाब विचारला पाहिजे,” अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी टीकास्त्र डागले.

हे देखील वाचा: सर्च ऑपरेशनदरम्यान थरार! दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार; चकमकीने परिसर हादरला

यावर अनिकेत तटकरे म्हणाले की, “आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या लग्नासाठी काकी काल सावर्डे येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गाडीचे मी सारथ्य मी केले. याआधीही अनेक वरिष्ठ नेत्यांचे सारथ्य केले आहे. त्यामुळे कारण नसताना हा वाद का वाढवला जातोय. हे माझ्या आकलनशक्तीच्या पलिकडे आहे. राष्ट्रवादीच्या कुटुंबातील सदस्य येतात, त्यांचं स्वागत करणे, सारथ्य करणे यात गैर वाटत नाही. सुनेत्रा पवार ज्या वाहनाने विवाहस्थळापर्यंत पोहोचल्या ते शासकीय वाहन नव्हते. त्यामुळे त्यात शासकीय चालक देखील नव्हता. काकी येणार म्हणून मी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून आम्ही एक खासगी वाहन उपलब्ध केले होते. याआधी दादांकरता देखील असे नियोजन आम्ही करत होतो. त्यामुळे खासगी वाहनात चालक म्हणून बसणे यात मला गैर वाटत नाही,” अशा शब्दांत अनिकेत तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील वाचा: ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये पडली वादाची ठिणगी? मनसे-शिवसेना वादावर संजय राऊतांचे सूचक विधान

या प्रकरणावर मंत्री आदिती तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आदरणीय सुनेत्राकाकी आज पहिल्यांदाच कोकणात आल्या. अशा प्रसंगी अनिकेतभाईंनी काकींच्या वाहनाचे सारथ्य केले. मुळात ते सरकारी नव्हे तर एक खासगी वाहन होते आणि याबाबत अनिकेतभाईंनी उपमुख्यमंत्री कार्यालयासोबत यापूर्वीच संपर्क साधून माहिती दिली होती. आदरणीय अजितदादा, आदरणीय सुनेत्राकाकी यांनी आम्हाला लहानाचे मोठे होताना पाहिलं आहे.. पार्थदादा, जयदादा यांच्याप्रमाणे अनिकेतभाई आणि आम्ही काकींची लेकरेच आहोत. याच भावनेतून कुटुंबाचे सदस्य म्हणून अनिकेतभाईंनी काकींच्या वाहनाचे सारथ्य केले. ज्यांच्या मनातील वात्सल्याची भावना मेली आहे, ज्यांच्या डोक्यात सतत राजकारण आहे अशा माणसांनी यातही राजकारण शोधलं यात काही नवल नाही,” अशी प्रतिक्रिया आदिती तटकरे यांनी दिली आहे.

Web Title: Sushma andhare target aniket tatkare for drive sunetra pawar car in chiplun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Sunetra Pawar
  • sushma andhare

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि  देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: राजकारण, अर्थव्यवस्थेसह आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

“… तो इतर पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे नसावा”; BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विधान
2

“… तो इतर पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे नसावा”; BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विधान

महाराष्ट्राच्या राजकारणात गणिताचा खेळ बदलणार? लोकसभेच्या 24 आणि विधानसभेच्या 100 जागा वाढणार? केंद्राचा नवा प्लॅन!
3

महाराष्ट्राच्या राजकारणात गणिताचा खेळ बदलणार? लोकसभेच्या 24 आणि विधानसभेच्या 100 जागा वाढणार? केंद्राचा नवा प्लॅन!

Maharashtra Politics : “सुनेत्रा पवारांना महाविकास आघाडीकडून अधिकृत पाठिंबा नाही पण..; खासदार संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4

Maharashtra Politics : “सुनेत्रा पवारांना महाविकास आघाडीकडून अधिकृत पाठिंबा नाही पण..; खासदार संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.