मुंबई: महाराष्ट्र लुटण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा महाराष्ट्राचे दौरे करत आहेत. त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे, कमजोर करायचा आहे. अमित शाहांच्या डोळ्यात महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राचा स्वाभिमान खुपत आहे. महाराष्ट्राने जसे लोकसभा निवडणुकीचे निकाल दिले, ते पाहता त्यांना महाराष्ट्राला आणखी कमजोर करायचा आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका जाहीर करत नाहीत. पण जर तुमच्यात हिंमत असेल तर हरियाणासोबत महाराष्ट्राच्याही निवडणुका घ्या,अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी थेट अमित शाहांनाच खुले आव्हान दिले आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “मुंबई महापालिकेच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. मुंबई महापालिका लुटण्यासाठी तुम्ही तुमच्या माणसांच्या हातात महापालिका दिली. हाच तर सर्वात मोठा घोटाळा आहे. म्हणजे तुम्ही येणार आणि तुमचे दलाल, मुंबई लुटून तुम्हाला देणार. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सारखे पक्ष फोडून महाराष्ट्र विकलांग करायचा हेत्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी ते महाराष्ट्रात येत असतात. ज्याप्रमाणे त्यांनी मुंबईतले उद्योग पळवले तसे ते एक दिवस लालबागचा राजाही पळवणार नाहीत ना, अशी भिती वाटते. ते काहीही करू शकतात. ते स्वत:ला महाराष्ट्राचे शत्रू मानतात.अशी टीकाही त्यांनी केली आहे.
हेदेखील वाचा: भारताचे आवडते हिल स्टेशन कोसळण्याच्या मार्गावर? ‘Queen of Hills’ नाहीशी होऊ शकते
पवांरांच्या डोक्यात काय चाललंय हे विचारायला फडणवीसांच्या डोक्यात मेंदू आहे का, हे त्यांना कोणी सांगितले. पवारांचा मेंदू पवारांच्या डोक्यात, पवाराच्या डोक्यात काय चाललंय हे फडणवीसांना कळलं असतं तर आज त्यांच्या आयुष्याची, प्रतिष्ठेची आणि राजकारणाची जी घसरण झाली आहे, ही अवस्था झाली नसती ना, शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे तुम्हाला शंभर जन्म कळणार नाही. त्यांच्या डोक्यात काय चाललंय 2019 साली देखील फडणवीसांना कळलं नव्हतं. पण तरीही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच ना, हिंमत असेल तर 2024 ला वेळेत निवडणूक घ्या. मग कोणाच्या डोक्यात काय आहे आणि काय बाहेर येतेय ते समजेल फडणवीसांचा मेंदू काम करायचंच बंद होईल, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.
“मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली.पण मी सामान्य माणूस आणि सामान्य मुख्यमंत्री म्हणून झगडलो, असे म्हणतात. या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “ज्याने 4 हजार कोटी केवळ निवडणूक लढवण्यासाठी बाजूला काढून ठेवलेत तो सामान्य माणूस कसा होऊ शकतो. 50-50 खोके, 100 खोक्यांना आमदार विकत घेणारा सामान्य माणूस कसा होऊ शकतो. मग सामान्य माणसाची व्याख्याच बदलावी लागेल, लोकसभा निवडणुकीत दोन हजार कोटी रुपये खर्च करणारा पक्षाचा माणूस सामान्य कसा असू शकतो,” ठेकेदरांचं राज्य सुरू आहे.
हेदेखील वाचा: महायुतीत नेमकं चाललंय काय? जागावाटपावरून महायुतीतील धुसफूस सुरूच