Photo Credit- Social media
मुंबई: राज्य विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसतशा महायुतीतील जागावाटपावरून होणारा संघर्ष वाढत चालला आहे. विधानसभेच्या जागावाटपावरून कोणीही महायुतीतील तीन प्रमुख नेत्यांशिवाय दुसरे कोणीही बोलू नये, अशा वरिष्ठांकडून सुचना असतानाही महायुतीतील नेते जागावाटपावरून दावे करणे थांबवत नसल्याचे दिसून येत आहे.
आमचा पक्ष 120 जागा मागेल आणि शंभर जागा निवडून आणेल, आमच्या पक्षाला इकडे-तिकडे जाण्याची गरजही नाही, एकनाथ शिंदे आमच्या पक्षाला मोठे यश मिळवून देतील, असा दावा शिंदे गटाच्या आमदार संजय गायकवाड यांनी केला. तर, जागावाटपाबाबत कोणीही बोलू नये, आम्हाला तो अधिकार नाही, पण जागावाटपाबाबत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जो फॉर्म्यला ठरवतील तोच अंतिम असेल, अशी प्रतिक्रीया संजय शिरसाट यांनी दिली आहे. तर शिंदेसेनेच्यामनात आले तर ते तीनशे जागाही निवडून आणतील, पैशांच्या बळावर आपण काहीही करू शकतो. असे त्यांना वाटते, असा टोला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
हेदेखील वाचा: शिवभक्तांना आता प्रथमच भारतीय भूमीतून पवित्र कैलास पर्वताचे दर्शन घेता येणार; 15 सप्टेंबरपासून
दुसरीकडे, राष्ट्रवादीला 80-85 जागा मिळू शकतात, काँग्रेस, अपक्ष असे धरून आमच्याकडे 60 आमदार आहेत,त्यामुळे आणखी वीस-पंचवीस जागा आम्हाला मिळाव्यात. भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांनी महायुतीतील मित्रपक्षांवर अन्याय होणर नाही, असा शब्द दिल्याचा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे.
तर, महायुतीमध्ये ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार निवडून येईल त्याला ती जागा द्यायची, असे आमचे ठरलेआ हे. त्यामुळे आमच्यात कोणताही वाद नसून, जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरवला जाईल,असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
हेदेखील वाचा: पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये नवा वाद! इराणच्या भालाफेकपटूचं का हिसकावलं सुवर्ण पदक