Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: तारकपूर स्थानकात सवलतीचा ‘स्मार्ट’ छळ; ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट, १५ दिवसांची प्रतीक्षा

तारकपूर स्थानकात सवलतीच्या स्मार्ट कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ‘कार्ड आले’ असा मेसेज मिळूनही १५ दिवसांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 17, 2026 | 12:26 PM
तारकपूर स्थानकात सवलतीचा ‘स्मार्ट’ छळ; ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट, १५ दिवसांची प्रतीक्षा (फोटो सौजन्य- पोपट पिटेकर)

तारकपूर स्थानकात सवलतीचा ‘स्मार्ट’ छळ; ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट, १५ दिवसांची प्रतीक्षा (फोटो सौजन्य- पोपट पिटेकर)

Follow Us
Close
Follow Us:
  • तारकपूर स्थानकात सवलतीचा ‘स्मार्ट’ छळ
  • ज्येष्ठ नागरिकांची ससेहोलपट
  • १५ दिवसांची प्रतीक्षा
पोपट पिटेकर, अहिल्यानगर : राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात सवलत मिळवून देणारे ‘NCMC स्मार्ट कार्ड‘ सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मनस्तापाचे कार्ड ठरत आहे. अहिल्यानगरमधील तारकपूर बस स्थानकात प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ७०-८० वयोगटातील वृद्धांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. ना पिण्यासाठी पाणी, ना बसण्यासाठी जागा; अशा भीषण अवस्थेत आपल्या हक्काच्या सवलतीसाठी या ज्येष्ठांना ‘भीक’ मागितल्यासारखी वागणूक मिळत असल्याने शहरात संताप व्यक्त होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे EVM पडताळणीची मागणी केली, ती मान्य न झाल्यास…; काँग्रेसचा इशारा

एकाच खिडकीवर शेकडो नागरिकांचा भार

गेल्या काही दिवसांपासून तारकपूर स्थानकावर स्मार्ट कार्डसाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. दररोज शेकडो नागरिक याठिकाणी येत असूनही महामंडळाने केवळ एकच खिडकी सुरू ठेवली आहे. तांत्रिक अडचणी आणि संथ इंटरनेटमुळे एका कार्डासाठी १५ ते २० मिनिटे लागतात. त्यामुळे सकाळपासून रांगेत उभे राहिलेल्या ज्येष्ठांचा नंबर सायंकाळपर्यंतही येत नाही. “जर गर्दी एवढी आहे, तर प्रशासनाने अतिरिक्त काउंटर का उघडले नाहीत?” असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

सुविधांचा ‘शून्याकार’: माणुसकी हरवलेली व्यवस्था

स्थानक परिसरात ज्येष्ठांसाठी साध्या मूलभूत सुविधाही पुरवल्या गेलेल्या नाहीत

बैठक व्यवस्थेचा अभाव: रांगेत उभ्या असलेल्या वृद्ध महिला आणि पुरुषांना बसण्यासाठी साध्या खुर्च्या किंवा बाकड्यांची सोय नाही. अनेक ज्येष्ठ नागरिक जमिनीवर किंवा पायऱ्यांवर बसून आपली पाळी येण्याची वाट पाहत आहेत.

पिण्याचे पाणी: उन्हाचा कडाका वाढत असताना स्थानकावर पिण्याच्या पाण्याची कोणतीही विशेष व्यवस्था रांगेत असलेल्या लोकांसाठी केलेली नाही.

उन्हाचा तडाखा: रांगेचा काही भाग उघड्यावर येत असल्याने ज्येष्ठांना उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

मेसेजचा ‘झोल’ आणि १५ दिवसांची अजब मुदत

प्रशासकीय गोंधळ इथेच थांबत नाही. अनेक ज्येष्ठांना ‘तुमचे स्मार्ट कार्ड प्राप्त झाले आहे’ असे मेसेज महामंडळाकडून पाठवण्यात आले आहेत. मात्र, हे ज्येष्ठ नागरिक जेव्हा कार्ड घेण्यासाठी खिडकीवर जातात, तेव्हा त्यांना “कार्ड अजून आले नाही, १५ दिवसांनी चौकशी करा” असे सांगून रिकाम्या हाती परत पाठवले जात आहे. मेसेज येऊनही कार्ड का मिळत नाही? आणि जर कार्ड आले नसेल तर मेसेज का पाठवले जातात? अशा दुहेरी कात्रीत नागरिक अडकले आहेत.

ज्येष्ठांचा संताप: “आम्ही लाचार आहोत का?”

आम्ही आयुष्यभर या राज्याची सेवा केली, टॅक्स भरला. आज वयाच्या ७५ व्या वर्षी एका कार्डासाठी आम्हाला असे रांगेत ताटकळत ठेवणे हा आमचा अपमान आहे. सरकारने सवलती जाहीर करून आमचे उपकार केलेले नाहीत, पण त्यासाठी आम्हाला अशा प्रकारे लाचार करणे थांबवावे, अशी प्रतिक्रिया एक संतप्त ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.

नागरिकांच्या मागण्या

१. अतिरिक्त खिडक्या: वाढती गर्दी लक्षात घेता तात्काळ किमान ३ ते ४ जादा काउंटर सुरू करावेत.
२. टोकन पद्धत: रांगेत तासनतास उभे राहण्यापेक्षा टोकन देऊन बसण्याची व्यवस्था करावी.
३. पाणी आणि सावली: रांगेच्या ठिकाणी पिण्याचे पाणी आणि आडोशाची सोय करावी.
४. स्पष्ट संवाद: कार्ड उपलब्ध नसल्यास नागरिकांना विनाकारण चकरा मारायला लावू नये.

प्रशासकीय दखल घेणार का?

तारकपूर स्थानकातील हा ‘स्मार्ट’ छळ थांबवण्यासाठी विभाग नियंत्रक तातडीने पावले उचलणार की ज्येष्ठांचे हे हाल असेच सुरू राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मुंबईची दुसरी ‘लाईफलाईन’ संकटात! बेस्टमध्ये 16 हजारांहून अधिक पदे रिक्त; अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक सेवेवर परिणाम

Web Title: Tarkapur station senior citizens smart card delay harassment news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 12:26 PM

Topics:  

  • railway

संबंधित बातम्या

Mumbai Local Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक; प्रवासापूर्वी वाचा लोकलचे वेळापत्रक
1

Mumbai Local Megablock : प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक; प्रवासापूर्वी वाचा लोकलचे वेळापत्रक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.