Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईसह कोकणात तापमानाचा पारा चढतोय; उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण

पालघर, रायगड आणि रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टी परिसरातील तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे मुंबईतील तापमान ३५ अंश सेल्सिअसपासून ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 01, 2025 | 09:23 AM
राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत...

राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. मुंबई आणि कोकणात फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेची लाट जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबईसह कोकणातील तापमान 40 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. वाढत्या उन्हामुळे सार्वजनिक ठिकाणे ओस पडली आहेत. नागरिकांसोबतच पक्षी आणि प्राण्यांनाही या उष्णतेचा फटका बसत आहे.

पालघर, रायगड आणि रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टी परिसरातील तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे मुंबईतील तापमान ३५ अंश सेल्सिअसपासून ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मुंबईत उन्हाच्या झळांमुळे गजबजलेली ठिकाणेही ओस पडली आहेत. नेहमी गर्दीने फुललेली दादर चौपाटीही उन्हामुळे रिकामी दिसत आहे. पहाटे या चौपाटीवर मोठ्या प्रमाणात नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. मात्र, उन्हाचा त्रास टाळण्यासाठी नागरिक आता सकाळी किंवा संध्याकाळीच बाहेर पडण्यास प्राधान्य देत आहेत.

पहाटे दादर परिसरात २७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर दुपारी या तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसपर्यंत गेलयाची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या तापमानामुळे फक्त नागरिकच नव्हे, तर पक्षी आणि प्राण्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. अनेक पक्षी उष्माघाताने बेशुद्ध पडत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

श्वसन आणि घशाचे आजार

मुंबई शहरासह उपनगरांत वायू प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहेत. त्यामुळे मुंबईत धुरकट वातावरण तयार झालं होतं. मुंबईतील हवेचा गुणत्ता निर्देशांक काल १५५ वर पोहोचला होता. हा निर्देशांक धोकादायक श्रेणीतील समल्या जातो. हवेतील पीएम १० चं प्रमाण २०१ वर गेलेय तर पीएम २.५ चं प्रमाण हे ६० वर पोहोचलं होतं. त्यामुळे श्वसनाचे आणि घशाचे आजार होण्याची शक्यता दाट आहे.

वाढत्या तापमानाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम

वाढत्या तापमानाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना काल सर्वदूर हवेत धूर पाहायला मिळाला. ज्याने दृष्यमानतेवर अंशता परिणाम होत असल्याचं जाणवतंय. मुंबई उपनगरांत तापमानाचा पारा 31 अंश आहे.

थंडीचे दिवस संपून आता उन्हाळा सुरु

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. थंडीचे दिवस संपून आता उन्हाळा सुरु होत आहे. त्यातच उत्तर भारतासह देशभरात उष्णता सतत वाढत आहे. येत्या काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आता एक नवीन पश्चिमी विक्षोभ येणार असल्याची माहिती दिली जात आहे.

Web Title: Temperature raise in mumbai and kokan region nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 09:23 AM

Topics:  

  • Increase in Temperature
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
1

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू
2

Big Breaking: मुंबईकर गुदमरले! मोनोरेल वाटेतच बंद; ऑक्सिजनशिवाय प्रवाशांचे…; रेस्क्यू ऑपरेशन सुरू

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…
3

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा
4

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.