कोयना प्रकल्पातून विक्रमी वीजनिर्मिती
गंगाखेड : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. पाऊस, वारे सुटत असल्याने शहरातील वीज वितरण यंत्रणात तार तुटणे, फ्यूज उडणे, वीज वाहक तारा तुटणे, तारांच्या घर्षणाने वीज खंडित होणे असे वारंवार होत असल्याने दिवसातून सारखा विजेचा लपंडाव होत आहे. दहा मिनिट वीज खंडित झाली की दहा मिनटात परत येते, परत जाते अशाप्रकारे विजेच्या लपंडावाने नागरिक वैतागले आहेत.
वीज खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी दहा हजार ग्राहकांना एकाच मोबाईल क्रमांकावर तक्रार करावी लागते. यामुळे कॉल सेंटरचा मोबाईल सतत व्यस्त येतो. उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि त्यात ढगाळी वातावरण निर्माण होत आहे. यामुळे दमट वातावरण, उकाडा, गर्मीने घरातील कुटुंबीयांची घालमेल, तगमग होत आहे. कुटुंबातील वृध्द व बाल यांना या उकाड्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यातच वीज पुरवठा खंडित झाल्यास घरातील पंखे, कुलर, एसी यांसारखे थंड हवा देणारे उपकरण बंद पडते.
वीज पुरवठा खंडित झाल्यास थंड हवा मिळत नसल्याने नागरिकांचा जीव घालमेल होतो. आजारी वृध्द आणि लहान मुलांना या उकाड्याचा त्रास सहन होत नाही. शहर सुविधाकडे वळवण्यासाठी कोट्यवधीची कामे होत असल्याचे दाखवले जाते. प्रत्यक्षात मात्र नागरिकांना वीजसेवाच मिळत नाही.
रात्रीच विजेचा लपंडाव
रात्रीच्या वेळी हमखास विजेचा लपंडाव सुरू होतो. रोहित्राला असलेले डबा अनेकदा उघडा असतो. त्यात असलेल्या फ्यूजला अॅल्युमिनियनची जाड तार फ्यूजला लावलेली असल्याने कुठे विजेमुळे अघटित घटना घडल्यास फ्युज उडत नाही. वाऱ्यात कुजलेल्या तारा तुटण्याचे प्रकार वाढत आहेत.