
Raj Thackeray news, Uddhav Thackeray news, raj Uddhav alliances today, Thackeray brother' alliance today,
पण त्याच वेळी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दंड थोपटले आहेत. पुणे महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात युती होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पुणे महापालिकेत भाजपची घुसखोरी रोखण्यासाठी आता पवार काका-पुतणे यांनीदेखील युतीची घोषणा केली आहे. मुंबईत ठाकरेंची मोठी ताकद आहे. तर पुणे हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मुंबई आणि पुणे महापालिकेला भाजपकडूनच मोठा धोका असल्याची चिंता या दोन्ही पक्षांना सतावत आहे. त्यामुळे या दोन महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजपची घुसखोरी रोखण्यासाठी उद्धव ठाकरे- राज ठाकरे आणि शरद पवार-अजित पवार यांच्या युती अंतिम झाली आहे. त्या दृष्टीने दोन्ही पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेही संयुक्तपणे कामाला लागले आहेत. पण ठाकरे बंधू आणि पवार काका पुतणे यांच्या युतीच्या राजकारणामुळे मात्र राजकारणीतील समीकरणेही बदलणार आहेत.
मंगळवारी सकाळी झालेल्या शिवसनेच्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी माहिती दिली. मुंबईसह राज्यातील सर्व २९ महानगरपालिकांबद्दल पक्षाच्या नेत्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. जागावाटपाबाबतची अंतिम बैठक सोमवारी रात्री झाली. आता फक्त उद्धव आणि राज हे मंचावर एकत्र येऊन घोषणा करण्यासाठी उरले आहेत.
ठाकरे बंधुंच्या युतीमुळे मुंबईतील मराठी मतदारांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता वाढली आहे. शिवसेना (Uddhav Thackeray) आणि मनसे यांच्या युतींमुळे मुंबईत ठाकरेंची ताकद वाढणार आहे. त्याचा थेट परिणाम भाजप, शिंदे गट आणि काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या पक्षांच्या रणनीतींवर होऊ शकतो. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभा निवडणुकांपर्यंत नव्या आघाड्या, जागावाटप आणि प्रचाराची दिशा बदलू शकते.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ही युती केवळ निवडणुकीपुरती मर्यादित न राहता दीर्घकालीन राजकारणावर प्रभाव टाकू शकते. मराठी अस्मिता, शहरी प्रश्न आणि तरुण मतदारांना आकर्षित करणाऱ्या मुद्द्यांवर ही आघाडी प्रभावी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. एकंदरीत, ठाकरे बंधुंच्या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली असून येणाऱ्या निवडणुकांत त्याचे स्पष्ट प्रतिबिंब दिसण्याची शक्यता आहे.
अजित २६ तारखेला घोषणा करणार आहेत
ठाकरे बंधूंमधील युतीनंतर, पुणे महानगरपालिकेत काका-पुतणे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील युतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार यांनी यांनी २६ डिसेंबर रोजी अधिकृतपणे युतीची घोषणा करणार असल्याचे सांगितले. तसेच, कार्यकर्ते आणि जनतेलाहीकोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले.