Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: “पाटील, पटेल या ठाकरेंच्या विधानाचा पटेलांकडून समाचार; म्हणाले, “ठाकरे, वाकरे…”

राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पाटील चालेल पण पटेल नको असे वक्तव्य राज ठाकरेंनी केले होते. यावर प्रफुल्ल पटेल यांनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 03, 2026 | 04:44 PM
Prafull Patel criticized Raj Thackeray regarding the NCP national presidency

Prafull Patel criticized Raj Thackeray regarding the NCP national presidency

Follow Us
Follow Us:
  • प्रफुल्ल पटेल यांचा दिल्लीमध्ये माध्यमांशी संवाद
  • प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत वक्तव्य
  • प्रफुल्ल पटेल यांची राज ठाकरेंवर टीका
Praful Patel on Raj Thackeray : नवी दिल्ली : दिवंगत नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना संपूर्ण देशातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. विविध ठिकाणी शोकसभांचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीमध्ये देखील अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. यामध्ये खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाच्या भविष्याबाबत देखील भाष्य केले आहे. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी मनसे नेते राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) टीकेवर प्रत्युत्तर दिले.

सुनेत्रा पवार यांचा सुतकामध्ये शपथविधी सोहळा झाल्यामुळे सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे. याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया देत पवार कुटुंबाच्या परंपरेबाबत सांगितले. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, प्रत्येक कुटुंबाची एक वेगळी प्रथा आणि परंपरा असते. काही लोक म्हणत होते की एवढ्या दिवस शोक असतो त्या काळामध्ये शपथविधी नाही केला पाहिजे. मात्र पवार कुटुंबामध्ये त्यांची परंपरा राहिली आहे की ते तीन दिवसांचा शोक पाळतात. आणि त्यानंतर आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी ते बाहेर पडतात. त्यामुळे चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

हे देखील वाचा : सुनील तटकरे यांच्या नावाने बनावट पत्र, सही अन् शिक्के; राष्ट्रवादीमध्ये जोरदार राजकारण सुरु

त्याचबरोबर अजित पवारांनंतर राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी प्रफुल्ल पटेल प्रयत्न करत असल्याचा आरोप मनसे नेते राज ठाकरे यांनी केला होता. मराठमोळ्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल होण्यापेक्षा पाटील चालेल अशा आशयाचे वक्तव्य राज ठाकरेंनी केले. यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडेल. आम्ही सगळे मिळून योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यासाठी सर्व पक्षामधून एकमताने निर्णय घेण्यात आला असून एकही नेत्याने याला विरोध केला नाही, असे मत प्रफुल्ल पटेल यांनी मांडले.

तर त्यांना लाज वाटली पाहिजे

त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल यांनी मनसे नेते राज ठाकरेंना देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “बाहेरचे लोक आमच्या पक्षाबद्दल काय बोलत आहेत? ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही असे लोक का बोलत आहेत? 1952 पासून माझ्या वडीलांना महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिले आहे. मलाही लोकांनी निवडणुकीमध्ये भरभरुन प्रेम दिलं आहे. आमच्याबद्दल आणि आमच्या पार्श्वभूमीबद्दल कुणी कमेंट करत असेल तर त्यांना लाज वाटली पाहिजे. मी महाराष्ट्राचा जनप्रतिनिधी म्हणून बसलो आहे. पक्षाचा निर्णय योग्य होईल. आणि माझ्या शिवायच होईल,अजून काय सांगायचं आहे?” असा संतप्त सवाल प्रफुल्ल पटेल यांनी उपस्थित केला.

हे देखील वाचा : पवार कुटुंबियांमध्ये किती दिवसांचा दुखवटा? टीका करणाऱ्यांना प्रफुल्ल पटेलांचे उत्तर, म्हणाले…

राज ठाकरे वाकरे माझ्या पक्षाचे आहेत का?

पुढे ते म्हणाले की, “आमच्या पक्षामध्ये संशय निर्माण करणं हे घाणेरडं राजकारण आहे. आम्ही आमचा योग्य निर्णय घेऊ. माझ्या शिवाय योग्य व्यक्तीला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून दिलं जाईल हे मी स्पष्टपणे सांगतो. जी जबाबदारी माझ्यावर आहे की मी योग्य पद्धतीने पार पाडतो. राज ठाकरे वाकरे माझ्या पक्षाचे आहेत का? की माझ्या पक्षाचा कोणता नेता आहे? आम्हाला राज ठाकरे किंवा सकाळी 9 चं बुलेटीन वैगरे किंवा तेलंगणाचा कुणी आहे त्यांनी आम्हाला सांगू नये,” अशी टीका प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे.

Web Title: Prafull patel criticized raj thackeray regarding the ncp national presidency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • ajit pawar
  • NCP Politics
  • praful patel
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
1

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना  इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!
2

Baramati Politics: ‘अजितदादा, बघताय ना सोमेश्वरकडे?’; पार्थ पवारांना इशारा देणारे पत्र बारामतीत व्हायरल!

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग
3

Ajit Pawar Airplane Crash : अजित पवार विमान अपघाताचा अंतिम अहवाल एका महिन्यात? घातपाताच्या तक्रारीनंतर हालचालींना वेग

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल
4

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.