प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
Mira Bhayandar Municipal Corporation: निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जावेद पठाण यांचे निधन झाले आहे. त्यांनी प्रभाग क्रमांक २२ मधून राष्ट्रवादी काँग्रेससाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
संभाजीगनगरात शिवसेना भाजप युती तुटल्यावर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. युती व्हावी यासाठी आम्ही वारंवार बैठक घेण्याचा प्रयत्न केला. बैठकीत युतीबाबत सर्व ठरले.
देशात सध्या हिंदुत्त्वाची मोठी लाट आहे. याचाच फायदा घेत मुंबई आणि मुंबईला लागून असलेल्या काही उमेदवारांकडून हिंदुत्त्ववादी नेत्यांच्या प्रचारसभांची मागणी होत आहे.
आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळणाऱ्या मुबंई महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. १५ जानेवारी ला मतदान होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी इच्छा व्यक्त केली जात होती. राजकीय विश्लेषकांपासून ठाकरेंच्या चाहते, कार्यकर्त्यांकडून त्यांनी एकत्र यावे, अशी मागणी होत होती.
ठाकरे बंधूंमधील युतीनंतर, पुणे महानगरपालिकेत काका-पुतणे शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील युतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार यांनी यांनी २६ डिसेंबर रोजी अधिकृतपणे युतीची घोषणा करतील
ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांच्यातील युती आज किंवा उद्या जाहीर होऊ शकते. युतीची घोषणा करण्यासाठी भव्य पत्रकार परिषद किंवा मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्याचे नियोजन दोन्ही पक्षांकडून करण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेची 20 नोव्हेंबरला जाहीर झालेली प्रारूप मतदार यादी मोठ्या गोंधळाला कारणीभूत ठरली आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाची भेट घेऊन पत्र सादर केले असून, अतिरिक्त वेळही मागण्यात आला आहे
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदारयादी विभाजनात गंभीर त्रुटी आणि गोंधळ कायम असल्याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते.
नगराध्यक्षपदाच्या तीन अर्जासह नगरसेवकाच्या दोन अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना रात्री उशिरा पर्यंत प्रतीक्षाच राहीली असल्याचे दिसून आले आहे. नगराध्यक्षपद आणि नगरसेवकाच्या पदासाठी ही चुरस आहे
राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महानगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
राज्यातल्या विविध महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज आरक्षण सोडती जाहीर झाल्या. ठाण्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण- महिला तसंच सर्वसाधारण अशा प्रवर्गांचं आरक्षण निश्चित करण्यात आलं.
BMC Ward Reservation News : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला.