Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Pune Expressway Update : तत्परतेने टोल वसुली, सरकारचा कोडगेपणा अनाकलनीय; राज ठाकरेंनी वाहतूक कोंडीवरुन जोरदार झापलं

Raj Thackeray : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 32 तास वाहतूक कोंडी झाली. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल झाले असून यावरुन मनसे नेते राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 05, 2026 | 12:03 PM
MNS Raj Thackeray Social Media post on Mumbai Pune Expressway traffic jam update live

MNS Raj Thackeray Social Media post on Mumbai Pune Expressway traffic jam update live

Follow Us
Follow Us:
  • मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 32 तास वाहतूक कोंडी
  • प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्यामुळे रोष
  • मनसे राज ठाकरेंची महामार्गाच्या कारभारावरुन सोशल मीडिया पोस्ट
Mumbai Pune Expressway Update : मुंबई : मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर 32 तासांहून अधिक वेळ वाहतूक ठप्प झाली. यामुळे पुण्याहून मुंबईला (mumbai Pune Highway) जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबली होती. यामुळे प्रवाशांना देखील मोठा त्रास सहन करावा लागला. या वाहतूक कोंडीमध्ये लहान मुले, महिला आणि अनेक लोक तासतास अन्न-पाण्याशिवाय अडकून राहिले होते. एका गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्यामुळे ही वाहतूक थांबली होती. गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरून मध्यरात्री दोन वाजता दोन्ही लेन सुरू करण्यात आलेल्या आहेत. अखेर हा ट्रक सरकवण्यात आल्यानंतर वाहतूक हळू हळू सुरु होत आहे. दरम्यान, या परिस्थितीवरुन मनसे नेते राज ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. फक्त टोलवसुली केली जाते आणि नंतर चौकशी केली जाईल असे सांगितले जाते, अशी नाराजी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) व्यक्त केली.

काय आहे राज ठाकरेंची पोस्ट?

मनसे नेते राज ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन राज्य सरकारवर या वाहतूक कोंडीसाठी निशाणा साधला आहे. राज ठाकरेंनी लिहिले आहे की, “मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रशासन घेतं का? हा प्रश्न आहे.”

हे देखील वाचा : सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला घाई, मग विमान अपघाताच्या चौकशीला विलंब का?; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल

“मंगळवार ३ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ च्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली.”

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रशासन घेतं का? हा प्रश्न आहे. मंगळवार ३… pic.twitter.com/2RA5yxOG0Z — Raj Thackeray (@RajThackeray) February 5, 2026

“महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच. ते होतं जर टोल घेता, तर मग सरकार, टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की, रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का? परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा. हल्ली मुंबई-पुणे प्रवास हा नक्की किती तासांत होईल याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि ३२ तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे.”

हे देखील वाचा : 22 तास अन्न, पाण्याशिवाय…! Mumbai-Pune Express वे ठप्प अन् सरकार गप्प; सर्व एसटी बस रद्द

ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकश्यांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरु असतात. पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे याचा सरकारने विचार करावाच.

Web Title: Mns raj thackeray social media post on mumbai pune expressway traffic jam update live

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • highway news
  • Mumbai-Pune Highway
  • Pune Mumbai
  • raj thackeray

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट
2

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल
3

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’
4

‘राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत,’ अमित ठाकरेंचं गणरायाकडे साकडं, ‘मला माहितीये तो माणूस…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.