Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हीच ती वेळ आणि हाच तो क्षण ! सावली सोडणार साथ, ठाणेकरांना उद्या शून्य सावली दिवस अनुभवण्याची संधी

सूर्याचं उत्तरायण व दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. याचाच अर्थ कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो. त्यामुळे वर्षातून दोनदा शून्य सावली दिवस येतात.

  • By साधना
Updated On: May 16, 2023 | 06:25 PM
zero shadow day

zero shadow day

Follow Us
Follow Us:

आपली सावली कधीही आपली साथ सोडीत नाही, असं नेहमी म्हटलं जातं. मात्र असं म्हटलं जात असलं तरी ते शंभर टक्के सत्य नाही. कारण वर्षात असे दोन दिवस असतात ज्या दिवशी भर दुपारी काही क्षण आपली सावलीही आपली साथ सोडून देते. या दिवसांना ‘शून्य सावली दिवस’ (Zero Shadow Day)असं म्हणतात. खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण(D. K. Soman) यांनी यासंदर्भातील माहिती दिली. (Zero Shadow Day In Thane)

 ठाणेकरांना कधी घेता येणार शून्य सावलीचा अनुभव?
येत्या बुधवारी म्हणजेच 17 मे रोजी मध्यान्ही ठाणेकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येणार आहे. बुधवारी दुपारी 12 वाजता घंटाळी मैदान नौपाडा ठाणे येथे मराठी विज्ञान परिषदेतर्फे शून्य सावलीचं प्रात्यक्षिक दाखवून संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण व कार्यवाह प्रा. ना. द. मांडगे मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेतर्फे करण्यात आलं आहे.

दा. कृ. सोमण यांचा खुलासा
मकर वृत्त आणि कर्कवृत्त प्रदेशात दोन वेळा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. स्थळांचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती समान झाली तर मध्यान्हकाली सूर्य बरोबर डोक्यावर येतो आणि आपली सावली त्यावेळी दिसेनाशी होते. ठाण्यात बुधवारी 17 मे रोजी अक्षांशाएवढीच सूर्याची क्रांती असणार आहे. त्यामुळे मध्यान्ही 12.35 मिनिटांनी सूर्य डोक्यावर येणार आहे. त्यामुळे सावली दिसणार नसल्याचं दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे.

शून्य सावली म्हणजे काय?
सूर्याचं उत्तरायण व दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50° दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. याचाच अर्थ कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्यावर येतो. त्यामुळे वर्षातून दोनदा शून्य सावली दिवस येतात. उत्तरायण होताना एकदा आणि दक्षिणायन होताना एकदा शून्य सावली दिवस येतो. तसेच सूर्य दररोज 0.50 ° सरकतो म्हणजे तो एकाच अक्षवृत्तावर 2 दिवस राहतो. त्यामुळे एकाच ठिकाणावरून दोन दिवस शून्य सावली अनुभवता येते. भारताचा विचार केल्यास अंदमान-निकोबार बेटावर इंदीरा पॉइंट येथे 6.78° अक्षवृत्तावर 6 एप्रिल तसेच 5 सप्टेंबर रोजी दुपारी सूर्य अगदी डोक्यावर असतो आणि शून्य सावली दिवस घडतो. पुढे 10 एप्रिल आणि 1 सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथे शून्य सावली दिवस येतो आणि तो दक्षिण भारतात तेलंगणा येथे 2 मे पर्यंत विविध अक्षवृत्तावर असलेल्या शहरात अनुभवता येतो.

Web Title: Thane citizens may exprerience zero shadow day on 17th may nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2023 | 06:21 PM

Topics:  

  • thane
  • Thane news

संबंधित बातम्या

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
1

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान
2

Thane Ring Metro: ठाणे रिंग मेट्रो थेट मुंबई, भिवंडी आणि कल्याणला जोडली जाणार; प्रवास होणार वेगवान

KDMC News : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू; KDMCची मोठी कारवाई, RMO डॉक्टरला कामावरून हटवलं!
3

KDMC News : प्रसूतीदरम्यान नवजात बाळाचा मृत्यू; KDMCची मोठी कारवाई, RMO डॉक्टरला कामावरून हटवलं!

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान
4

carrom tournament : गणाधीश चषक स्पर्धेत प्रसन्न गोळेला जेतेपद, सोहमला उपविजेतेपदावर मानावे लागले समाधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.