Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik: बाळासाहेब ठाकरे कलादालन सुरू होणार? प्रताप सरनाईक यांची १० लाख खर्चाची तयारी; दिवाळीत विद्यार्थ्यांना विशेष संधी

Pratap Sarnaik: बाळासाहेब ठाकरे कलादालन सुरू करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे. कलादालन सुरू ठेवण्यासाठी महिन्याला येणारा १० लाख रुपयांचा खर्च उचलण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. दिवाळीच्या सुट्टीत सलग सात दिवस शाळकरी मुलांसाठी कलादालन खुले ठेवावे आणि त्यानंतरही ते नियमित सुरू ठेवावे...

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 06, 2026 | 05:47 PM
बाळासाहेब ठाकरे कलादालन सुरू होणार? प्रताप सरनाईक यांची १० लाख खर्चाची तयारी; दिवाळीत विद्यार्थ्यांना विशेष संधी

बाळासाहेब ठाकरे कलादालन सुरू होणार? प्रताप सरनाईक यांची १० लाख खर्चाची तयारी; दिवाळीत विद्यार्थ्यांना विशेष संधी

Follow Us
Follow Us:
  • बाळासाहेब ठाकरे कलादालन सुरू करण्यासाठी प्रताप सरनाईक आक्रमक
  • महिन्याचा १० लाखांचा खर्च उचलण्याची तयारी!
  • सरनाईक यांची प्रशासनाला सूचना
मिरा-भाईंदर : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या लोकार्पणानंतरही नागरिकांसाठी त्याचे दरवाजे बंद असल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. दिवाळीच्या निमित्ताने हे कलादालन किमान सात दिवस शाळकरी मुलांसाठी खुले करावे आणि त्यानंतरही नियमितपणे सुरू ठेवावे, अशी स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. विशेष म्हणजे, कलादालनाच्या देखभालीसाठी दरमहा लागणारा सुमारे १० लाख रुपयांचा खर्च उचलण्याची तयारीही सरनाईक यांनी दर्शवली. (Pratap Sarnaik)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत या कलादालनाचे लोकार्पण करण्यात आले होते. विज्ञान केंद्र, बालविभाग, सभागृह, प्रदर्शन दालने, वाचनालय आणि उपाहारगृह अशा विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, लोकार्पण होऊनही अद्याप हे कलादालन नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Minor Girl Pregnant Case: अल्पवयीन प्रेयसीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून अत्याचार; १० आठवड्यांची गर्भवती राहिली अन्…

दरमहा सुमारे १० लाख रुपये खर्च

महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार, कलादालनाची सुरक्षा, स्वच्छता, कर्मचारी, तिकीट व्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा, जनरेटर, सीसीटीव्ही आणि उद्वाहक यांच्या देखभालीसाठी दरमहा सुमारे १० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच इमारत अद्याप कंत्राटदाराकडून महापालिकेच्या ताब्यात आलेली नसल्याचे आणि कलादालन चालविण्याबाबतचे धोरणही निश्चित झाले नसल्याचे सांगितले जात आहे.

महापालिकेची आर्थिक परिस्थिती आणि खर्चाची जबाबदारी यावरून कलादालन सुरू करण्यास विलंब होत असेल, तर महापौरांनी याबाबत लेखी पत्र द्यावे. महापालिकेला दरमहा दहा लाखांचा खर्च परवडत नसेल, तर हा संपूर्ण खर्च उचलण्याची माझी तयारी आहे, असे प्रताप सरनाईक यांनी ठणकावून सांगितले.

कलादालन तातडीने नागरिकांसाठी खुले…

यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकीच्या काळात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागायची आणि त्यांच्याच नावाने उभारलेल्या कलादालनाला विरोध करायचा, ही भूमिका योग्य नसल्याची टीका त्यांनी केली. बाळासाहेबांच्या विचारांचा आणि नावाचा सन्मान राखायचा असेल, तर हे कलादालन तातडीने नागरिकांसाठी खुले झाले पाहिजे, अशी ठाम भूमिका सरनाईक यांनी मांडली.

आता प्रताप सरनाईक यांनी स्वतः महिन्याचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवल्यानंतर तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे दरवाजे नागरिकांसाठी खुले होणार का, याकडे मिरा-भाईंदरकरांचे लक्ष लागले आहे.

Brother Murder: झोपेत नैसर्गिक मृत्यूचा रचला बनाव,शर्टची कॉलर सरकताच उघडकीस आले भयानक सत्य; मोठ्या भावानेच घेतला धाकट्याचा जीव!

💡

Frequently Asked Questions

  • Que: बाळासाहेब ठाकरे कलादालन सुरू करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला आहे?

    Ans: परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कलादालन सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

  • Que: कलादालन सुरू ठेवण्यासाठी प्रताप सरनाईक किती खर्च उचलण्यास तयार आहेत?

    Ans: कलादालन सुरू ठेवण्यासाठी महिन्याला होणारा १० लाख रुपयांचा खर्च उचलण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

  • Que: दिवाळीत कलादालनाबाबत प्रशासनाला काय सूचना देण्यात आल्या आहेत?

    Ans: दिवाळीच्या सुट्टीत सलग सात दिवस शाळकरी मुलांसाठी कलादालन खुले ठेवावे आणि त्यानंतरही ते सुरू ठेवावे, अशी सूचना करण्यात आली आहे.

Web Title: Balasaheb thackeray art gallery pratap sarnaik offers monthly expense sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 05:47 PM

Topics:  

  • Balasaheb Thackeray
  • pratap sarnaik
  • thane

संबंधित बातम्या

MSRTC St Bus: एसटीच्या NCMC Card संदर्भात महत्त्वाची अपडेट! एसटी प्रवासासाठी आता लगेच…; प्रताप सरनाईक यांचा निर्णय
1

MSRTC St Bus: एसटीच्या NCMC Card संदर्भात महत्त्वाची अपडेट! एसटी प्रवासासाठी आता लगेच…; प्रताप सरनाईक यांचा निर्णय

Dombivli News: आधुनिक सुविधांनी सज्ज होणार सावित्रीबाई फुले नाट्यगृह; पुनर्विकासासाठी ३० कोटी मंजूर
2

Dombivli News: आधुनिक सुविधांनी सज्ज होणार सावित्रीबाई फुले नाट्यगृह; पुनर्विकासासाठी ३० कोटी मंजूर

Ulhasnagar News: सुभाष टेकडी परिसरात दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर; उलट्या, जुलाबाच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये भीती
3

Ulhasnagar News: सुभाष टेकडी परिसरात दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर; उलट्या, जुलाबाच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये भीती

MSRTC Employees: एसटी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला! पीएफ, ग्रॅच्युइटी, दिवाळी भेट अन् महागाई भत्ता रखडला; आंदोलनाचा इशारा
4

MSRTC Employees: एसटी कर्मचाऱ्यांचा संताप वाढला! पीएफ, ग्रॅच्युइटी, दिवाळी भेट अन् महागाई भत्ता रखडला; आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.