Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली; 5 वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू

दिवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे लहान मुलं आणि परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचं समोर आलंय. 

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 23, 2025 | 05:04 PM
Thane News : भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली; 5 वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:
  • आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न
  • 5 वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू
दिवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे लहान मुलं आणि परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचं समोर आलंय.  दिवा शहरातील बेडेकर नगर, दिवा–आगासन रोड परिसरात कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर उपचार सुरू असतानाच 5 वर्षीय निशा शिंदे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे महापालिका प्रशासन व सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.17 नोव्हेंबर रोजी घराबाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चिमुकलीवर हल्ला केला होता. त्यानंतर तिला तातडीने डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू करून आवश्यक इंजेक्शन्स दिल्याची माहिती देण्यात आली.

पुढील काही आठवडे तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. 3 डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी तिची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. मात्र 16 डिसेंबर रोजी चौथे इंजेक्शन दिल्यानंतर अचानक तिची प्रकृती बिघडली आणि रेबिजची लक्षणे दिसू लागल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

Kalyan News : गोठ्यात घुसून तीन वासरांवर केला हल्ला; कल्याणमध्ये बिबट्याची दहशत

परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे पोहोचल्यानंतर तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.उपचार सुरू असताना दीर्घ कालावधीनंतर रेबिजची लक्षणे दिसणे हे गंभीर स्वरूपाचे असून उपचार पद्धती, औषधांचा दर्जा, वैद्यकीय निरीक्षण व संदर्भ प्रक्रियेबाबत वस्तुनिष्ठ तपास होणे आवश्यक आहे, असे ठाकरे सेनेचे विधानसभा संघटक ॲड. रोहिदास मुंडे यांनी नमूद केले.या प्रकरणात कोणतीही वैद्यकीय अथवा प्रशासकीय त्रुटी झाली आहे का, याची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“लवकरच ठाणे-मुलुंड रेल्वे स्थानकाचे काम सुरु होणार…”, रेल्वेमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी केली चर्चा

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवा परिसरात नेमकी काय घटना घडली?

    Ans: दिवा शहरातील बेडेकर नगर, दिवा–आगासन रोड परिसरात 17 नोव्हेंबर रोजी एका पिसाळलेल्या कुत्र्याने 5 वर्षीय निशा शिंदे या चिमुकलीवर हल्ला केला. उपचार सुरू असतानाच 16 डिसेंबर रोजी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

  • Que: कुत्रा चावल्यानंतर तिला कोणते उपचार देण्यात आले?

    Ans: कुत्रा चावल्यानंतर तिला तातडीने डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रेबिज प्रतिबंधक आवश्यक इंजेक्शन्स देण्यात आली आणि काही आठवडे उपचार सुरू होते.

  • Que: उपचारादरम्यान तिची प्रकृती कधी बिघडली?

    Ans: 16 डिसेंबर रोजी चौथे इंजेक्शन दिल्यानंतर अचानक तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर रेबिजची लक्षणे दिसू लागल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

Web Title: Thane divanews the terror of stray dogs increased 5 year old child tragically died during treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 05:04 PM

Topics:  

  • Marathi News
  • Street dogs
  • Thane news

संबंधित बातम्या

Ratnagiri News : पालिकेच्या नव्या इमारतीसाठी महिनाभरात निधी देणार; उदय सामंत यांचं आश्वासन
1

Ratnagiri News : पालिकेच्या नव्या इमारतीसाठी महिनाभरात निधी देणार; उदय सामंत यांचं आश्वासन

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश
2

Solapur News : प्राचीन रोमन–भारतीय व्यापार संबंधांवर पडणार नवा प्रकाश

Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा
3

Jalna : युती न झाल्यास वेगळा विचार करु ; अर्जुन खोतकरांचा इशारा

Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप
4

Kolhapur News : शरद कारखान्याचे मळीमिश्रीत पाणी नदीत मिसळत गावकऱ्यांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.