ठाणे/स्नेहा जाधव,काकडे: दिवा परिसरातील “दिवा जंक्शन – एक चरित्र आणि चारित्र्य” या पुस्तकामध्ये आगरी-कोळी समाजाविषयी खोटी, असत्य, बदनामीकारक व समाजविघातक माहिती प्रकाशित करण्यात आल्याने स्थानिक समाजबांधवांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर आगासनगाव संघर्ष समिती तर्फे ॲड. रोहिदास मुंडे व माजी नगरसेवक हिरा पाटील उदय मुंडे तर आगरी कोळी संघर्ष समितीतर्फे हेमंत नाईक किरण दळवी विराज पाटील प्रवीण तांडेल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन संबंधित लेखक राम माळी व प्रकाशक सुधीर राऊत यांच्या विरोधात तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात खालील भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे:
कलम 153A – विविध समाजांमध्ये वैमनस्य पसरविणे
कलम 295A – धार्मिक/सांस्कृतिक भावना दुखावणे
कलम 500 – मानहानी
कलम 504 – जाणीवपूर्वक अपमान करून शांतता भंग करणे
कलम 505(2) – विशिष्ट समाजाविरुद्ध द्वेष व तणाव निर्माण करणे
या पुस्तकातील मजकूरामुळे समाजात तणाव निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्था बिघडण्याचा धोका असल्याचे संघर्ष समितीने स्पष्ट केले आहे. म्हणूनच संबंधित लेखक व प्रकाशकाला तात्काळ अटक करून, विवादित मजकूर जप्त करण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक आगरी-कोळी समाज व भूमिपुत्र बांधवांनी देखील या कारवाईसाठी आपला पाठींबा दर्शविला असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी नितीन पवार पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर पोलीस निरीक्षक शरद कुंभार पोलीस निरीक्षक अमोल कोळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी सातपुते गोपनीय अमलदार यांना यावेळी निवेदन देण्यात आले निवेदन देताना आगासनगाव संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड.रोहिदास मुंडे माजी नगरसेवक हिरा पाटील उदय मुंडे आगरी कोळी संघर्ष समिती तर्फेविराज पाटील किरण दळवी हेमंत नाईक प्रवीण तांडेल महेश पाटील सोपान म्हात्रे किशोर म्हात्रे विजय म्हात्रे नयन भगत श्रीराम भगतचिन्मय पवार,यज्ञेश पवार रतिलाल मुंडे आदी आगरी कोळी बांधव उपस्थित होते.