Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane News : पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका; सावध राहा, सुरक्षित रहा! जिल्हाधिकाऱ्यांच नागरिकांना आवाहन

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आरोग्य विभागास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 23, 2025 | 04:32 PM
Thane News : पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका; सावध राहा, सुरक्षित रहा! जिल्हाधिकाऱ्यांच नागरिकांना आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे/ स्नेहा जाधव, काकडे: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी आरोग्य विभागास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी नागरिकांना सर्पदंशासंदर्भात योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तत्काळ उपचाराचे महत्त्व समजावून सांगत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी सरसावले आहेत.

पावसाळ्यात साप मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घेणं गरजेचं आहे.

सर्पदंश झाल्यास काय करावे?
• रुग्णाला शक्य तितके स्थिर व शांत ठेवावे
• रुग्णाची हालचाल टाळावी, शक्य असल्यास उचलून घ्यावे
• दंश झालेला अवयव हृदयाच्या खाली ठेवावा
• जखमेवर साफ कपड्याने हलका दाब द्यावा – कसून बांधणे टाळा
• तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात रुग्णाला पोहोचवा
• श्वासोच्छ्वास अडचण असल्यास – CPR/ऑक्सिजन सुविधा वापरा (उपलब्ध असल्यास)
• शक्य असल्यास सापाचा फोटो घ्या (पण सापाला हात लावू नका)
• सर्पदंशाची वेळ लक्षात ठेवा

सर्पदंश झाल्यास काय करू नये?
• पारंपरिक उपचारांवर (जडीबुटी, मंत्र, झाडफळं) विश्वास ठेवू नका
• जखमेवर चिरा करू नका, विष शोषू नका
• बर्फ किंवा गरम पाण्याचा वापर टाळा
• रुग्णास खाणे/पिणे देऊ नका
• वेदनाशामक, झोपेची औषधे किंवा मद्य देऊ नका
• सापाला पकडू किंवा मारू नका
• जखम कसून बांधू नका, त्यामुळे रक्ताभिसरण थांबते

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध सुविधा:
• ASV (Anti Snake Venom) उपलब्ध
• प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी
• अॅड्रेनालिन, अट्रोपीन, निओस्टिगमीन व इतर आवश्यक औषधे
• २४x७ उपचाराची व्यवस्था

नागरिकांना आवाहन:
• रात्री बूट, टॉर्च, काठी वापरून बाहेर पडा
• परिसर स्वच्छ ठेवा, झाडेझुडपे व ओला कचरा हटवा
• झोपताना मच्छरदाणीचा वापर करा
• शेतात काम करताना गमबूट वापरा
• रात्री चालताना जोरात पावले टाका – साप दूर राहतात
• झोपताना शक्य असल्यास उंचावर झोपा
• मुलांवर विशेष लक्ष ठेवा
• १०२ / १०८ क्रमांकावर तत्काळ संपर्क साधा,असं आवाहन करण्यात आलं आहे.

Web Title: Thane news danger of snakebite during monsoon be careful stay safe district collector appeals to citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2025 | 01:32 PM

Topics:  

  • latest news
  • Marathi News
  • Thane news

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार
1

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार

Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला  पाककला स्पर्धेचे खास आकर्षण
2

Chiplun News : वाशिष्ठी कृषी महोत्सवात खवय्यांची पर्वणी ! 8 व 9 जानेवारीला पाककला स्पर्धेचे खास आकर्षण

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण
3

Satara News : ग्रंथदिंडीने मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ; पोलिस बँड पथकाच्या निनादात सातारा साहित्यनगरीत ध्वजारोहण

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध
4

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.