Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहशतवाद ठेचलाच पाहिजे! गणेशोत्सवानिमित्त ठाण्यात देशभक्तीचा उत्साह वाढवणाऱ्या देखाव्याची जोरदार चर्चा

ठाण्यात गणेशोत्सवानिमित्त एका गणेश मंडळाने ‘दहशतवाद ठेचलाच पाहिजे’ असा संदेश देणारा देखावा उभारला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 05, 2025 | 09:35 PM
गणेशोत्सवानिमित्त ठाण्यात देशभक्तीचा उत्साह वाढवणाऱ्या देखाव्याची जोरदार चर्चा

गणेशोत्सवानिमित्त ठाण्यात देशभक्तीचा उत्साह वाढवणाऱ्या देखाव्याची जोरदार चर्चा

Follow Us
Close
Follow Us:

गणेशोत्सवाच्या निम्मिताने अनेक मंडळं विविध देखावे उभारून त्याद्वारे सामाजिक संदेश देत असतात. ठाण्यात देखील मोठया उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. ठाण्यात एका मंडळाने दहशतवाद ठेचलाच पाहिजे म्हणत देशभक्तीचा संदेश दिला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

ठाण्यातील आझाद नगर नं. २ येथील जय भवानी मित्र मंडळाच्यावतीने ३९ व्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १९८७ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाकडून दरवर्षी समाजाला जागरूक करणारे आणि विचार करायला लावणारे विषय निवडले जातात. मागील वर्षी ‘निष्काळजीपणामुळे होणारी जिवितहानी’ हा विषय घेऊन अपघातांच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता. यावर्षी मात्र मंडळाने देशभक्तीचा उत्साह वाढवणारा “दहशतवाद ठेचलाच पाहिजे” हा देखावा साकारला आहे.

Pune Crime: गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुणे रक्तरंजित! आंदेकर हत्येच्या बदल्यासाठी थेट जावयाच्या मुलालाच…

ठाण्यातील जय भवानी मित्र मंडळ यांच्यावतीने यंदा सजावटीमध्ये देशात झालेले अनेक दहशतवादी हल्ले दाखवण्यात आले आहेत. त्यामध्ये १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, २००२ सालचा घाटकोपर बस बॉम्बस्फोट, ११ जुलै २००६ रोजी उपनगरीय रेल्वे मार्गावरील मालिका बॉम्बस्फोट, २६/११ मुंबई हल्ला तसेच १४ फेब्रुवारी २०१९ जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या सीआरपीएफ वाहनांच्या ताफ्यावर एका आत्मघातकी बॉम्बरने हल्ला केला. ज्यामध्ये ४० भारतीय सुरक्षा कर्मचारी ठार झाले. या सर्व घटना वेधक पद्धतीने दाखवल्या आहेत.

त्याचबरोबर २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू आणि १७ जण जखमी झाले होते. या घटनेचे चित्रणही या देखाव्यात आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि त्यानंतर राबविण्यात आलेल्या ‘ ऑपरेशन सिंदूर’ ची माहिती चलतचित्रांद्वारे दाखविण्यात आली आहे. या मोहिमेत शहीद झालेल्या जवानांची छायाचित्रे, तसेच यश मिळवून देणाऱ्या तीन महिला कमांडरचे योगदान अधोरेखित करण्यात आले आहे. मंडळाने या माध्यमातून देशातील वीर जवानांच्या शौर्याला अभिवादन केले आहे.

Maharashtra Rain News: अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

प्रतिकात्मक गणेशमूर्ती

यंदा मंडळातील गणेशमूर्तीच्या हातात शस्त्र दाखवून “दहशतवाद संपवला जात आहे” हे प्रतिकात्मक दृश्य उभारण्यात आले आहे. संपूर्ण सजावटीतून दहशतवादाविरुद्ध जागरूकता आणि देशभक्तीची प्रेरणा देण्याचा प्रयत्न आहे.

शासनाला विनंती

दहशतवाद पुन्हा हल्ला करू शकतो त्यामुळे मंडळाने या देखाव्यातून शासनाला विनंती करण्यात आली आहे की आपल्या देशाच्या सीमा मजबूत करा तसेच शाळेत जाणाऱ्या मुलांना आर्मीचे शिक्षण द्या. जेणेकरून येणारी पिढी वेळप्रसंगी अतिरेक्यांशी युद्ध करून त्यांचा खात्मा करेल. तसेच अतिरेकांच्या हल्ल्याला बळी पडणार नाही.

याविषयी जय भवानी मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवसेना शाखाप्रमुख सतीश पवार, मंडळाचे कार्यकर्ते रिषभ धामणस्कर, विशाल गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली.

Web Title: Thane news patriotic theme on the occasion of ganeshotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 09:35 PM

Topics:  

  • ganesh charuthi
  • Thane news

संबंधित बातम्या

21 हजार पोलीस, 10 हजार CCTV आणि AI ची गर्दीवर करडी नजर, गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
1

21 हजार पोलीस, 10 हजार CCTV आणि AI ची गर्दीवर करडी नजर, गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Kalyan News : 22 तास वीज खंडित; संतप्त व्यापाऱ्यांचा महावितरणविरोधात आंदोलन
2

Kalyan News : 22 तास वीज खंडित; संतप्त व्यापाऱ्यांचा महावितरणविरोधात आंदोलन

Ganesh Chaturthi: उत्सवकाळात श्वसन संसर्ग वाढण्याचा धोका, प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
3

Ganesh Chaturthi: उत्सवकाळात श्वसन संसर्ग वाढण्याचा धोका, प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

पुण्याच्या अंतःकरणात लपलेलं आहे ‘हे’ गणपती मंदिर; जाणून घ्या भक्तांसाठी का आहे खास आणि विलक्षण?
4

पुण्याच्या अंतःकरणात लपलेलं आहे ‘हे’ गणपती मंदिर; जाणून घ्या भक्तांसाठी का आहे खास आणि विलक्षण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.